रेल्वे ठरली संजीवनी... सात हजार टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक 

रेल्वे ठरली संजीवनी... सात हजार टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक 

भुसावळ  : लॉकडाउन सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेने मालवाहू गाड्यांशिवाय पार्सल गाड्या सुरू केल्या आहेत. यात गेल्या ६० दिवसांत ३००० रॅकमध्ये १,४७,७४१ वॅगनची वाहतूक केली. तसेच विविध राज्यांमध्ये कोरोना संदर्भात आवश्यक पीपीई कीटसह ९४५ टन वैद्यकीय साहित्यासह ७००० टनाहून अधिक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आहे. 

मध्य रेल्वेच्या भुसावळसह मुंबई, नागपूर, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग, अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर सुमारे ७५ रॅक हाताळले जात आहेत. ज्यात अन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि सिमेंटसारख्या इतर वस्तूंचा समावेश आहे. रेल्वेस्थानक आणि नियंत्रण कार्यालयांमधील कर्मचाऱ्‍यांनी २३ मार्च ते २३ मे पर्यंत चोवीस तास सेवा देऊन, ३००० रॅकमध्ये १, ४७, ७४१ वॅगन आवश्यक वस्तू लोड करणे शक्य झाले आहे. १०१० वॅगन्स धान्य, ८०९ वॅगन्स साखर, ५९, ४८७ वॅगन्स कोळसा, ५१, २१५ वॅगन कंटेनर, १४, ०४२ वॅगन्समध्ये पेट्रोलियम पदार्थ, ५८६१ वॅगन्समध्ये फर्टिलाइजर, २३४९ वॅगन्समध्ये स्टील, ३७८ वॅगन्समध्ये डी-ऑइल केक, ५६८५ वॅगनमध्ये सिमेंट, आणि ६, १३८ वॅगन मध्ये विविध वस्तू रवाना केल्या आहेत. 

४५८ पार्सल गाड्या 
या विभागातून भुसावळसह मुंबई, नागपूर, सोलापूर आणि पुणे येथून सुमारे ४५८ पार्सल गाड्या चालविल्या जात असून, त्यामध्ये औषधे, भाज्या, नाशवंत वस्तू, पोस्टल बॅग आदी आवश्यक वस्तू देशभरात पाठवल्या जात आहेत. मध्य रेल्वेने २४ मे पर्यंत ७००० टनाहून अधिक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली. ज्यामध्ये औषध, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, अंडी, बियाणे, टपाल बॅग आणि कच्चा माल समाविष्ट आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com