मजुराला घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात

accident
accident

वाकोद (ता. जामनेर) : सोलापूरहुन यावलला मजुर घेऊन येणाऱ्या ट्रकला वाकोद-पहुर रस्त्यावर मोठा अपघात झाला. आयशर ट्रक पलटी झाल्याने त्यामधील पाच जण जखमी झाले असून, चालकाच्या प्रसंगाधवानाने उर्वरित सुखरूप बचावले.

लॉक डाउन मधे अडकलेले मजूर सध्या सूट मिळाल्याने आपापल्या गावाची ओढ धरित असल्याने अशाच सोलापूर येथील ४८ स्त्री-पुरुष व लहान मुले मिळून तब्बल शंभर जण सोलापूरहुन (एम. एच. १३, आर. ४४९५) या क्रमांकाची आयशर गाडीने निघाले होते. आज (ता. ११) सकाळी नऊच्या सुमारास वाकोद (ता. जामनेर) जवळ पहुर रस्त्यावर भरगच्च भरलेली आयशर गाडी पलटी झाली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, अपघातस्थळी वाकोदचे पोलिसपाटील संतोष देठे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश जोशी, सकाळचे प्रतिनिधी विलास जोशी यांनी तात्काळ धाव घेत, जखमींना मदत करुन डॉक्टरांकडून उपचार केले. त्यांना गाडीतून सुखरूप काढून दुसऱ्या गाडीत टाकून त्यांच्या घराकडे रवाना केले. सर्वजण साकळी (ता. यावल) येथील असल्याचे त्यांनी सांगितले. यौवळी पोलिस उपनिरीक्षक अमोल देवडे, बिट हवालदार लिंगायत यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी सुधाकर जोशी, तेजराव जोशी, सतीश बिऱ्हाडे, नंदू मंडाले आदींनी सहकार्य केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com