बायोमॅट्रीक हजेरीची निर्णय हवेत विरली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नाशिक : इंटीग्रेटेड कोचिंग क्‍लासेसला आळा घालण्यासाठी विज्ञान शाखा असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमॅट्रीक पद्धतीने हजेरी घेण्याची निर्णय हवेत विरला आहे. शासन निर्णय पारीत झाल्यानंतर एक महिन्यांत यासाठीची यंत्रणा बसविणे अपेक्षित होते. मात्र दोन महिने उलटूनही अद्यापपर्यंत बहुतांश महाविद्यालयांत यासंदर्भातील उपाययोजना केलेल्या नसल्याचे चित्र आहे. 

नाशिक : इंटीग्रेटेड कोचिंग क्‍लासेसला आळा घालण्यासाठी विज्ञान शाखा असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमॅट्रीक पद्धतीने हजेरी घेण्याची निर्णय हवेत विरला आहे. शासन निर्णय पारीत झाल्यानंतर एक महिन्यांत यासाठीची यंत्रणा बसविणे अपेक्षित होते. मात्र दोन महिने उलटूनही अद्यापपर्यंत बहुतांश महाविद्यालयांत यासंदर्भातील उपाययोजना केलेल्या नसल्याचे चित्र आहे. 

शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 15 जूनला यासंदर्भातील शासन निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहाता फक्‍त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहातात. व नियमित वर्गाऐवजी कोचिंग क्‍लासमध्ये उपस्थित राहत असल्याचे नमुद करतांना, यास आळा घालण्यासाठी बायोमॅट्रीक पद्धतीने हजेरी घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता.

राज्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बायामेट्रीक पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच बायोमेट्रीक उपस्थिती सुरू करण्यासाठी आवश्‍यक यंत्रसामुग्री कनिष्ठ महाविद्यालयांनी शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एक महिन्याच्या आत स्वत: उपलब्ध करून देण्याचेही नमुद केले होते. मात्र प्रत्यक्षात बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांत यासंदर्भात कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे. 

या पाच विभागात बायामेट्रीक 
उपस्थितीचा घेतलाय निर्णय 

2018-19 या शैक्षणिक वर्षाकरीता नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या पाच विभागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायामेट्रीक पद्धतीने घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. या शहरांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रियादेखील राबविण्यात आली आहे. 

बायामेट्रीक उपस्थितीकरीता अडथळ्यांची शर्यत.. 
*छोट्या संस्थांच्या महाविद्यालयांना निधीची अडचण. 
*जास्त विद्यार्थी क्षमतेच्या महाविद्यालयांना लागणार जास्तीचे मशीन. 
*यंत्रसामग्रीच्या खर्चाचा भार विद्यार्थ्यांवर येण्याची भिती. 
*पळवाटा दुर करत यंत्रणा सक्षम करण्याचे आव्हान. 
 

 

Web Title: marathi news bio metric attandance