धरणे भरले ....पक्षी उतरले...पक्षिप्रेमी आनंदले...

अमोल खरे
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

मनमाड - यंदा परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे शेतशीवर नद्या, नाले, ओढे तलाव, बंधारे आणि धरणे ओसंडून वाहू लागल्याने दिवाळीनंतर गुलाबी
थंडीत येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षासह इतर पक्षांच्या आगमनाची प्रतीक्षा पक्षीमित्र करीत आहेत. जिल्ह्यातील काही धरणावर दरवर्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात थंडीत फ्लेमिंगो पक्षासह इतर पक्षी हजेरी लावतात.

मनमाड - यंदा परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे शेतशीवर नद्या, नाले, ओढे तलाव, बंधारे आणि धरणे ओसंडून वाहू लागल्याने दिवाळीनंतर गुलाबी
थंडीत येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षासह इतर पक्षांच्या आगमनाची प्रतीक्षा पक्षीमित्र करीत आहेत. जिल्ह्यातील काही धरणावर दरवर्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात थंडीत फ्लेमिंगो पक्षासह इतर पक्षी हजेरी लावतात.

                   'पाणी असले की दूरचे पाखरे येतात' अशी म्हण काहीशी पक्षी आणि धरणासंदर्भात रूढ करावी लागेल नाशिक जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन तीन वर्षांपासून पाऊस होत असला तरी इतर भागात मात्र पावसाने पाठ फिरवली होती मात्र यंदा परतीच्या पावसाने नाशिक जिल्हा ओलाचिंब करून दिला असल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्या, नाले, ओढे, बंधारे, तलाव, धरणात पाणी आल्याने हे जलसाठे  ओसंडून वाहू लागले आहे धरणातील पाणी जीवन असल्याने माणसांसह पशुपक्ष्यांनाही त्याचा फायदा होतो धरणात पाणी मुबलक असल्याने आता पक्षीप्रेमींना पक्षांची चाहूल खुणावू लागली आहे देशी परदेशी पाहुणे दरवर्षी तलाव धरणावर हजेरी लावतात अनेकदा कमी पाणी असल्याने अनेक समस्यांचा सामना या पक्षांना करावा लागतो यंदा मात्र मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे देशी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील काही धरणे फ्लेमिंगोच्या  हजेरीसाठी जास्त प्रसिद्ध आहेत.

दरवर्षी उत्तरेकडील देशात वाढणाऱ्या थंडी पासून संरक्षणासाठी व अन्नाच्या शोधात देशी-परदेशी पक्षीही येथे हजेरी लावतात. या सगळ्यात जेव्हा अग्निपंख हे जेव्हा जमिनीवरून हवेत झेपावत, त्यावेळी अवकाशात अग्नीच्या ज्वाळा निघाल्याचा जणू भास होतो. त्यांना पाहण्यासाठी व निरीक्षणासाठी नाशिक जिह्यासह इतर जिल्ह्यातील पक्षीप्रेमी तलाव, धरणावर हजेरी लावतात. यावर्षी दिवाळी सणातही पावसाने हजेरी लावल्याने परदेशी पाहुणे पक्ष्यांचे आगमन लांबणार असल्याचे मत पक्षीमित्र करीत आहेत. यंदा चार वर्षांनंतर मनमाडचे वाघदर्डी धरण  भरल्याने मनमाडकर समाधान व्यक्त करीत आहेत.गेल्या जुलै २०१७ म्हणजे दोन वर्षापूर्वी  'फ्लेमिंगों' चे दर्शन या धरणात झाले होते धरणात पाणी मुबलक असल्याने यावर्षी गुलाबी फ्लेमिंगो चे दर्शन होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bird in river