गोंदे दुमाला येथे कामगारांवर बिबट्याचा हल्ला, हेल्मेटमुळे वाचले प्राण.

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

अस्वली स्टेशन-: इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी तानाजी नाठे रात्री कामावरून घरी परतत असतांना अचानक दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात नाठे यांनी बिबट्याशी काही काळ संघर्ष करत आपली सुटका केली. पण केवळ हेल्मेटमुळे आपला जीव वाचविण्यात त्यांना यश आले आहे. 

अस्वली स्टेशन-: इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी तानाजी नाठे रात्री कामावरून घरी परतत असतांना अचानक दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात नाठे यांनी बिबट्याशी काही काळ संघर्ष करत आपली सुटका केली. पण केवळ हेल्मेटमुळे आपला जीव वाचविण्यात त्यांना यश आले आहे. 
            गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीतील माॅस्ड्राॅफर कंपनीत कामाला असलेले तानाजी नाठे हे राञी बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत असतांना अचानक दबा धरुन बसलेल्या बिबट्याने नाठे यांच्यावर हल्ला चढवला.या हल्ल्यात ते दुचाकीवरून खाली पडले असता बिबट्याने  पुन्हा त्यांच्याकडे धाव घेत हल्ला केला दोन्ही हातांना पंजाने जखमा केल्या आहेत.नाठे यांनी हिंम्मत न हरता काही काळ आपल्या हातात असलेल्या जेवणाच्या डब्याने बिबट्याशी संघर्ष करत आपला बचाव केला.डोक्यामध्ये हेल्मेट असल्यामुळे असून त्याच्या हल्ल्यांपासून आपली सुटका करण्यात नाठे यांना यश आल्याचे यावेळी सांगितले़.

 घटनेची माहिती वनविभागाला दुरध्वनीवरून दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहत परिसरात याआधी देखील बिबट्याने येथील जाधव वस्ती,तानाजी नाठे यांच्या शेतवस्तीवरील ठिकाणी गायी, वासरे, कुञी आदी प्राण्यांवर हल्ला चढवत फडशा पाडला होता.

गेल्या काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. जवळच असलेल्या भारतीय सैन्यदलाच्या हद्दीत असलेल्या जंगलात आपले भक्ष शोधण्यासाठी हे बिबटे शेतवस्तीवर येत असतात.या ठिकाणी बिबट्याचा पुन्हा एकदा वावर वाढला असून या परिसरात वनविभागाने गांभीर्याने लक्ष देवून या ठिकाणी हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची गरज असल्याची नागरिकांनी मागणी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bitbtya attack