भाजपा युवा मोर्चाचा उद्या कॉफी विथ युथ- युवा संवाद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

नाशिक- भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून उद्यापासून सकाळी दहाला पंचवटीतील हिरावाडी येथील श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविदयालय येथे 18 ते 25 वयोगटातील नव मतदारांची संवाद साधण्यासाठी जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा.उन्मेश पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र प्रत्येक जिल्हयात भाजपाचे युवा खासदार युवकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधत भाजपा बद्दल त्यांच्या अपेक्षा काय? भविष्यात महाराष्ट्र कसा विकसित व्हावा या कल्पना जाणून घेण्यासाठी कॉफी विथ युथ- युवा संवाद हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास नाशिक जिल्हायातील सर्व नव मतदारांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ×ड.अजिंक्‍य साने, जिल्हाध्यक्ष समिर चव्हाण, शहर सरचिटणीस तथा कार्यक्रम प्रमुख अमित घुगे, अमोल पाटील, संजय शिरसाट, विजय राजभोज, विनायक खालकर, तुषार जगताप, ऋषिकेश आहेर, सुयोग वाडेकर, सागर परदेशी, वैभव महाले, हर्षद जाधव, शांताराम घंटे, दिपक राऊत, निलेश भंदुरे आदींनी केले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bjp coffee with youth