महापालिकेतून सानप पर्व संपण्याची चिन्हे...! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

नाशिक: महासभेत पक्षाची रणनिती ठरविण्यासाठी प्रत्येक महासभेपुर्वी सत्ताधारी पक्षाची होणारी बैठक यंदा न झाल्याने भाजपअंतर्गत बदलाच्या चर्चेला जोर चढला आहे. महापालिकेच्या कामकाजावर सुक्ष्म लक्ष ठेवून असलेल्या आमदार बाळासाहेब सानप यांना पक्षश्रेष्ठींकडून पालिकेच्या कामकाजापासून दुर राहण्याच्या सुचना देण्यात आल्याने त्याचा हा परिणाम असून यातून पालिकेतील सानप पर्व अस्ताकडे झुकतं असल्याचे मानले जात आहे. 

नाशिक: महासभेत पक्षाची रणनिती ठरविण्यासाठी प्रत्येक महासभेपुर्वी सत्ताधारी पक्षाची होणारी बैठक यंदा न झाल्याने भाजपअंतर्गत बदलाच्या चर्चेला जोर चढला आहे. महापालिकेच्या कामकाजावर सुक्ष्म लक्ष ठेवून असलेल्या आमदार बाळासाहेब सानप यांना पक्षश्रेष्ठींकडून पालिकेच्या कामकाजापासून दुर राहण्याच्या सुचना देण्यात आल्याने त्याचा हा परिणाम असून यातून पालिकेतील सानप पर्व अस्ताकडे झुकतं असल्याचे मानले जात आहे. 
शहरातील सत्ताकारणाच्या दृष्टीने महापालिकेला महत्व आहे. महापालिकेत दर महिन्याला एक महासभा होते त्या महासभेत विरोधक सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यासाठी प्रयत्न करतात तर विरोधकांच्या रणनितीला तोंड देण्यासाठी सभागृहात काय भुमिका घ्यायची याची व्युहरचना सत्ताधारी पक्षाकडून केली जाते. प्रत्येक पक्षाकडून त्यांच्या पध्दतीने रणनिती ठरविण्याचे नियोजन केले जाते. महासभा होण्यापुर्वी एक दिवस पालिकेत गटनेत्यांच्या दालनात बैठक घेण्याची परंपरा आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून महासभेपुर्वी बारा ते तेरा मिटींग झाल्या आहेत. कधी रामायण निवासस्थानावर तर कधी गटनेत्यांच्या दालनात, यापुर्वी गटनेत्यांच्या दालनात झालेली बैठक व फक्त भाजप नगरसेवकांच्या जेवणावळीवर महापालिकेच्या तिजोरीतून झालेला लाखो रुपयांचा खर्च चर्चेचा विषय ठरला होता. भाजपच्या प्रत्येक बैठकीला आमदार सानप हजर होते. सभागृहात कोणी काय बोलावे व विरोधकांना कशी उत्तरे द्यायची याचे पाठ आमदार सानप यांनी नगरसेवकांना दिले. परंतू गेल्या दोन आठवड्यापासून महापालिकेत मुंढे पर्व सुरु झाले आहे. त्याला कारणीभुत भाजपमधील अंतर्गत संघर्ष असून गेल्या बारा महिन्यातील कारभाराचे अनेक किस्से मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले व त्यातून भाजपची बदनामी होत असल्याचे लक्षात आल्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आयुक्त पदावर तुकाराम मुंढे यांना बसवून भाजपच्या शहरातील नेते व स्थानिक आमदारांच्या कुरबुरींना चाप लावला. मुंढे यांच्या नियुक्तीनंतर भाजप नेत्यांचा महापालिकेतील हस्तक्षेप जवळपास संपुष्टात आल्याचे दिसतं आहे. त्याचाच परिणाम म्हणून मंगळवारी (ता. 20) होणाऱ्या महासभेपुर्वी भाजपची पार्टी मिटींग शनिवारी होणे अपेक्षित होते परंतू पक्षाचे संघटनमंत्री किशोर काळकर यांनी आमदार सानप यांना महापालिकेच्या कामकाजापासून दुर राहण्याचा सल्ला दिल्याने महासभेपुर्वीची मिटींग झाली नसल्याचे नगरसेवकांमध्ये चर्चा होती. 

अधिकाऱ्यांची मिटींग 
महासभेत नगरसेवकांच्या प्रश्‍नांना अनेकदा उत्तरे देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडते. पुढच्या महासभेत अहवाल देतो असे सांगून वेळ मारून नेली जाते परंतू यंदा तसे उत्तर देता येणार नाही. महासभा सुरु होण्यापुर्वी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेच्या विषय पत्रिकेवर व प्रशासनाची भुमिका यावर धोरण ठरविण्यासाठी बैठक बोलाविली आहे. 
 

Web Title: marathi news bjp internal cresh