आचारसंहिता भाजपच्या पथ्थ्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

नाशिक- लोकसभा व सातपूर विभागातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लागु झालेली आचारसंहिता भाजपच्या पथ्यावर पडली आहे. पोटनिवडणुक बिनविरोध झाल्याने शासनाच्या राजपत्रात विजयी उमेदवाराचे नाव समाविष्ट होणे बाकी आहे त्यानंतर स्थायी समितीवर उर्वरित एका सदस्याची नियुक्ती होवून स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी विभागिय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महापौर, उपमहापौर पदासह विषय समित्यांवर देखील भाजपची सत्ता आहे. परंतू जेष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांचे निधन झाल्याने सभागृहातील भाजप सदस्यांची संख्या 66 वरून 65 झाली. त्यामुळे स्थायी समिती मधील गुणोत्तर प्रमाण घटले. सदस्यांच्या घटलेल्या गुणोत्तराच्या आधारे शिवसेनेने स्थायी समितीवर अतिरिक्त एक सदस्याची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bjp profit