प्रियंका राजकारण प्रवेशाने एकाची भर : भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नाशिक- उत्तर प्रदेशातील मतदारांनी कॉंग्रेसला पुर्णपणे नाकारतं विकासाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियंका गांधी राजकारणात आल्याने काहीचं फरक पडतं नाही. राहुल गांधी सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याने प्रियंका यांना पुढे करतं कॉंग्रेसच्या राजकारणात एकाने संख्या वाढल्याची टिका भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजु यांनी केली. 

    नाशिक, दिंडोरी, शिर्डी व नगर लोकसभा मतदारसंघाच्या एकत्रित बैठकी प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलतं होते. एकेकाळी आपसात कुस्ती खेळणारे समाजवादी व बहुजन समाज पक्ष एकत्र आले. परंतू त्यांच्यातील राजकारण नकारात्मक पध्दतीचे आहे. मोदींना विरोध व कुठल्याही मार्गाने सत्ता मिळवायचीचं हा एकमेव अजेंडा घेवून ते मैदानात उतरले असून जनता त्यांना स्विकारणार नाही. कॉंग्रेसने गेल्या पाच वर्षात यशस्वी होण्याचे अनेक प्रयोग केले परंतू राहुल गांधी यांची जादु चालली नाही. त्यामुळे प्रियंका गांधी यांना आता पुढे केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने समाजातील सर्व घटकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्यासाठी मोहिम सुरु करण्यात आली आहे. शहर व जिल्हा कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेल्या एका पेटीत नागरिकांनी सुचना, मते मांडायची आहे. प्राप्त झालेल्या सुचनांचा जाहिरनाम्यात समावेश केला जाणार आहे.

गांभिर्याने निवडणुकांना सामोरे जा- शिंदे 
व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या आवारात नाशिक, दिंडोरी, नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाला संबोधित करताना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, देशात इतर पक्ष शक्तीहिन झाले असून महाआघाडी करूनही उपयोग नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात देश उभारणीचे काम केले आहे. कॉंग्रेसच्या सत्ताकाळात जी कामे झाली नाही ती कामे पाच वर्षात पुर्ण करण्यात भाजप सरकारला यश आले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेली कामे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले 

Web Title: marathi news bjp shakti samelan