आश्रमशाळांचा धान्य पुरवठा बंद; ठेकेदार काळ्या यादीत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नाशिक : अप्पर आदिवासी आयुक्तालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांना 2018-19 या शैक्षणिक वर्षात अन्न-धान्याचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचा धान्यांचा पुरवठा केल्याप्रकरणी ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून तसे आदेश आल्यानंतर आयुक्तालयामार्फेत ही कारवाई होत आहे. याबाबत आदिवासी संघटनेकडून ठेकेदारांच्या निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याची तक्रारही निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

नाशिक : अप्पर आदिवासी आयुक्तालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांना 2018-19 या शैक्षणिक वर्षात अन्न-धान्याचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचा धान्यांचा पुरवठा केल्याप्रकरणी ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून तसे आदेश आल्यानंतर आयुक्तालयामार्फेत ही कारवाई होत आहे. याबाबत आदिवासी संघटनेकडून ठेकेदारांच्या निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याची तक्रारही निवेदनाद्वारे करण्यात आली होती. ठेकेदाराकडून गेल्या काही दिवसांपासून आश्रमशाळांना धान्याचा पुरवठा देखील बंद करण्यात आल्याने मुख्यध्यापकांना आपल्या स्तरावरच अन्न धान्यांची खरेदी आदेशही देण्यात आले आहे. 
 

Web Title: marathi news black list contracter