जीवघेणा 'ब्लू व्हेल' पसरतोय ग्रामिण महाराष्ट्रातही? जामनेरला मुलाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

जामनेर : रशियामध्ये जन्म झालेला अॅन्ड्रऑईड मोबाईल व्हिडिओगेम 'ब्लू व्हेल' या खुनी खेळाने धोक्‍याची पातळी गाठली आहे. विधानसभेत चर्चा होऊनही अद्याप त्यावर पूर्णत: बंदी आणण्यात सरकारला यश आले नाही. आता हा गेम ग्रामिण महाराष्ट्रात पाय पसरू लागल्याचे दिसते आहे. जामनेर तालुक्‍यात पंधरावर्षीय मुलाने जीव दिल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दिल्लीनंतर मुंबईच्या अंधेरीतील चौदावर्षीय मुलाने उंच इमारतीवरून उडी घेतल्याची घटना ताजीच असताना, येथे पंधरावर्षीय मुलाने गळफास घेतल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी मात्र पोलिस ठाण्यात कुठलीच नोंद नसून, प्रशासन अद्याप अनभिज्ञ आहे.

जामनेर : रशियामध्ये जन्म झालेला अॅन्ड्रऑईड मोबाईल व्हिडिओगेम 'ब्लू व्हेल' या खुनी खेळाने धोक्‍याची पातळी गाठली आहे. विधानसभेत चर्चा होऊनही अद्याप त्यावर पूर्णत: बंदी आणण्यात सरकारला यश आले नाही. आता हा गेम ग्रामिण महाराष्ट्रात पाय पसरू लागल्याचे दिसते आहे. जामनेर तालुक्‍यात पंधरावर्षीय मुलाने जीव दिल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दिल्लीनंतर मुंबईच्या अंधेरीतील चौदावर्षीय मुलाने उंच इमारतीवरून उडी घेतल्याची घटना ताजीच असताना, येथे पंधरावर्षीय मुलाने गळफास घेतल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी मात्र पोलिस ठाण्यात कुठलीच नोंद नसून, प्रशासन अद्याप अनभिज्ञ आहे. बदनामीच्या भीतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. 

जामनेर तालुक्‍यातील सवतखेडा गावातील मूळ रहिवासी व वाघारी येथे नववीचे शिक्षण घेत असलेल्या पंधरावर्षीय कपिलने (काल्पनिक नाव) गळफास घेतल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. कुटुंबीयांनी गावातील डॉक्‍टरांना बोलावून तपासणी केली. त्याला गळफास घेऊन बराच वेळ झाल्याचे डॉक्‍टरांनी तोंडी सांगीतले. अल्पवयीन मुलाने आत्महत्या का केली असावी? पालकांचा छळ होता की शिक्षकांचा? असे प्रश्‍न उपस्थित होऊन पोलिसांच्या चौकशीला नाहक सामोरे जावे लागेल, याची अल्पशिक्षित कुटुंबीयांत भीती होती. कपिलच्या अंत्यसंस्कारानंतर त्याचा मोबाईल नातेवाइक तरुणाने पाहिल्यावर त्यात 'ब्लू व्हेल' हा खेळ आढळून आल्याने तरुणाला धक्काच बसला. मुंबईच्या घटनेनंतर गेल्या काही दिवंसापासून दूरचित्रवाणी वाहिन्यांसह वृत्तपत्रांत सुरू असलेल्या चर्चा, बातम्या आणि थेट विधानसभेत चर्चा होत असल्याने गाव-खेड्यातही 'ब्लू व्हेल' गेमची दहशत अगोदरच पोहोचली होती. ज्यांना- ज्यांना कपिलच्या मृत्यूचे कारण कळले, त्यांच्या भुवया उंचावल्या. चर्चेतून घटनेचा उलगडा झाला अन्‌ प्रकरण समोर आले. 

पोलिस प्रशासन अनभिज्ञ 
नववीतील कपिलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समजताच जामनेर पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, सवतखेडा (ता. जामनेर) येथून एकाही अल्पवयीन मुलाच्या आत्महत्येची साधी नोंदही पोलिस दप्तरी नव्हती. ग्रामीण रुग्णालयात, जिल्हा रुग्णालयात अशा कुठल्याच बालकावर शवविच्छेदन करण्यात आल्याचे आढळून आले नाही. कारण, कुटुंबीयांनी नको चिरफाड अन्‌ पोलिसांची चौकशी या भीतीने परस्पर कपिलवर अंत्यसंस्कार करून मोकळे झाले आहेत. 

कुटुंबानंतर तालुक्‍यात दहशत 
गावातील नववीचा विद्यार्थी 'ब्लू व्हेल' गेमच्या जाळ्यात अडकून आत्महत्या केल्याची चर्चा सवतखेडा, वाघारीसह तालुक्‍यात सकाळपासून सुरू आहे. कुणीतरी अफवा पसरवली असावी, असे वाटत असताना गावातून आणि संबंधित मुलाच्या कुटुंबातून माहिती घेतल्यानंतर त्यांनी त्याच्या मोबाईल गेमचा विषय नाव न छापण्याच्या अटीवर मान्य केला. तो 'ब्लू व्हेल' नावाचा गेम खेळत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सवतखेडा येथील पंधरावर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचे प्रकरण समजले. मात्र, त्यासंबधी खात्री होऊ शकली नाही, म्हणून कुठलीच नोंद पोलिस ठाण्यात नाही. परस्पर अंत्यसंस्कार केले असतील, तर यासंबंधी अधिक माहिती घेतली जाईल. 

- नजीर शेख, पोलिस निरीक्षक, जामनेर 

'ब्लू व्हेल' काय आहे? 
ऍण्ड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबद्वारे खेळला जाणाऱ्या 'ब्लू व्हेल'ची फेसबुक, व्हॉटस्‌ऍपद्वारे लिंक पाठवली जाते. गेममध्ये पन्नास दिवसांत एकानंतर एक 50 पातळ्या गाठायच्या (स्टेप्स) असतात. पन्नास दिवसांच्या 'टास्क'मध्ये अखेरची 'स्टेप' ही मृत्यूला कवटाळणारी ठरते. गेममध्ये सहभागी होण्यासाठी स्वत: कुठल्या पातळीपर्यंत आपण त्रास देऊ शकता, याचा पुरावा म्हणून व्हिडिओ क्‍लीप ऍडमिनला पाठवावी लागते. तसेच या गेमसाठी ट्रेनर दिला जातो. त्याच्या सूचनांचे पालन करून हा मृत्यूच्या पायऱ्या गाठणारा खेळ खेळला जातो. एकदा गेममध्ये एन्ट्री झाली, की मुलांचे एकप्रकारे संमोहन केले जाते. कधी भीती, तर कधी अधिक फायद्याची खात्री दिली जाते. परिणामी त्यातून बाहेर पडणे अशक्‍य होते. तसा प्रयत्न केला तर धमकीचे मेसेजही येतात.

या आहेत जीवघेण्या स्टेप्स...

  • मध्यरात्री हॉरर चित्रपट पाहणे 
  • स्वत:ला जखमी करणे
  • हाताच्या नसा कापणे
  • शेवटची 'स्टेप' स्वत:ला संपवणे 

सोशल मीडियावर 'डेथ' ग्रुप नावानेदेखील या ग्रुपची ओळख आहे. पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल देताना दक्षता घेणे आवश्‍यक मानले जात आहे. 

Web Title: Marathi News Blue Whale Game Horror Jalgaon district Maharashtra