डोंगरावर अडकलेल्या त्या मुलांची सुखरूप सुटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

इंदिरानगर-इंदिरानगर- पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या आणि वाट चुकलेल्या दोन मुलांची आज जलद प्रतिसाद पथक ,वैनतेय गिर्यारोहण संस्था ,सिडको अग्निशामक दल आणि इंदिरानगर पोलीसांच्या पथकाने सुखरूप सुटका केली .गोविंद नगर येथील निलय कुलकर्णी आणि त्याचा मित्र गर्व सावलानी हे दोघे त्यांच्या दोन मित्रांसह येथे सकाळी ट्रेकिंगला गेले होते.
 
सकाळी नऊच्या सुमारास वाट चुकल्याने त्यांना खाली उतरणे अवघड झाल्यानंतर त्यांनी मित्रांना ही माहिती दिली. मित्र आणि नातेवाईकांनी वैनतेय संस्थेचे भाऊसाहेब कानमहाले यांना ही माहिती दिली. ते प्रणव भानुसे आणि रोहित हिवाळे यांच्यासह येथे पोचले .दरम्यान इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी आणि जलद प्रतिसाद पथकाचे उपनिरीक्षक समाधान हिरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर या दोघा युवकांना खाली उतरवण्यात आले .दोन दिवसापूर्वीच अशोका मार्ग येथील पाटील दांपत्य याच डोंगरावर फसल्यानंतर त्यांचीही मोहिम राबवत सुटका करण्यात आली. दिवसा नजीकच्या या घटनात वाढ होत असल्याने संबंध यंत्रणेने आता ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news boys in caves