चिमुकल्याचा खड्ड्यात पडून मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

नाशिक: संत कबीर नगरमध्ये शाळेतून घराकडे पतरणाऱ्या पहिल्या वर्गातील चिमुकल्याचा बांधकामाच्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यु झाला. अक्षय पंडित साठे (6, रा. संत कबीरनगर, गंगापूर रोड) असे त्याचे नाव आहे. 

नाशिक: संत कबीर नगरमध्ये शाळेतून घराकडे पतरणाऱ्या पहिल्या वर्गातील चिमुकल्याचा बांधकामाच्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यु झाला. अक्षय पंडित साठे (6, रा. संत कबीरनगर, गंगापूर रोड) असे त्याचे नाव आहे. 
  अक्षय हा संत कबीरनगर परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळा क्रमांक 16 मध्ये पहिल्या वर्गात शिकतो. शाळा सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत होती. अक्षय शाळेतून साडेनऊ वाजता बाहेर पडला आणिो घराकडे येत होता. त्यावेळी वाटेत एका इमारतीसाठी पायाभरणीसाठी खड्डा खोदलेला होता. सुमारे पाच ते सहा फुट खोल खडड्यात पावसाचे पाणी साचलेले होते. त्यामुळे अक्षय यास खड्डा लक्षात आला नाही आणि तो त्या खड्ड्यात पडला. त्यात बुडून त्याचा मृत्यु झाला. त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर पालकांनी एकाच टाहो फोडला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसातील शालेय विद्यार्थ्याची दुदैवी मृत्युची ही दुसरी घटना आहे. मंगळवारी (ता.30) दुपारी गंगापूर रोडवरील मराठा हायस्कुलमध्ये वर्गातील लोखंडी कपाट अंगावर पडून 12 वर्षीय जयेश अवतार या 7वीतील वर्गाचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news boys falt