पोलिस पित्याकडून गोळ्या झाडून सावत्र मुलांचा खून

residentional photo
residentional photo

नाशिक: कुटुंबात होणारे सततचे कौटुंबिक वाद हे कुठल्या थराला जाऊ शकतात, मनुष्याला अशा या तणावातून टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडते, याचा प्रत्यय शुक्रवारी (ता. 21) नाशिकमध्ये आला. पंचवटीतील पेठ रोडवरील घरगुती वादातून पोलिस कर्मचारी पित्याने केलेल्या गोळीबारात दोन सावत्र मुलांचा मृत्यू झाला. सोनू ऊर्फ अभिषेक नंदकिशोर चिखलकर (वय 25), शुभम नंदकिशोर चिखलकर (22) अशी दोघा सावत्र मुलांची नावे आहेत.

संजय अंबादास भोये (53, रा. राजमंदिर को-ऑपरेटिव्ह सोसायटी, अश्‍वमेघनगर, पेठ रोड, पंचवटी) असे संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, घटनेनंतर तो स्वतः पंचवटी पोलिसांत हजर झाला. भोये हा उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे शोधपथकात (डीबी) कार्यरत आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन-सव्वातीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक संजय भोये कुटुंबीयांसह पेठ रोडवरील अश्‍वमेघनगर येथील कौशल्य मंगल कार्यालयालगत राहतात. भोये गुरुवारी (ता. 20) रात्रपाळी करून शुक्रवारी घरात आराम करत होते. त्यांच्या पत्नीचे पहिल्या पतीपासून अभिषेक नंदकिशोर चिखलकर व शुभम नंदकिशोर चिखलकर हे दोन मुलगे असून, भोये यांच्यापासून एक मुलगी व मुलगा आहे. शुभमचे गेल्या महिन्यात कळवण येथील निकिताशी विवाह झाला. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून घरात वाद सुरू होते. शुक्रवारी दुपारीही भोये घरात असताना वाद झाला. त्या वेळी रागाच्या भरात संशयित भोये यांनी त्यांच्याकडील सर्व्हिस रिव्हाल्व्हरमधून सोनू ऊर्फ अभिषेक आणि शुभम या दोघांवर तीन गोळ्या झाडल्या. 
   जखमी अवस्थेत अभिषेक बाथरूममध्ये लपण्यासाठी पळाला. पण गोळी वर्मी बसल्याने तो त्याच ठिकाणी गतप्राण झाला. गंभीर जखमी अवस्थेतील शुभमला उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासत त्यास मृत घोषित केले. या घटनेनंतर संशयित संजय भोये स्वत: पंचवटी पोलिसांसमोर हजर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्‍त अशोक नखाते यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जिल्हा रुग्णालयात आई मनीषा भोये व मृत शुभमची पत्नी निकिता यांचा आक्रोश पाहून अनेकांचे मन हेलावले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com