बीएसएनएल उभारी घेत आहे : नितीन महाजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

नवीन टॉवर उभारणी, हॉटस्पॉट व ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे वाढविणे अशी कामे सुरू आहेत, अशी माहिती बीएसएनएलचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी सांगितले.

नाशिक - नवीन टॉवर उभारणी, हॉटस्पॉट व ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे वाढविणे अशी कामे सुरू आहेत, अशी माहिती बीएसएनएलचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी सांगितले.

"कॉफी विथ सकाळ' अंतर्गत "सकाळ'च्या संपादकीय विभागाच्या सहकाऱ्यांशी महाजन यांनी संवाद साधला. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने उपस्थित होते. महाजन म्हणाले, केंद्र सरकारच्या योजनेतून ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर केबलने जोडण्यात येत आहेत. वायफाय-ब्रॉडबॅंड सेवा उपलब्ध होईल, ग्राहक सेवा केंद्र सुरु करता येईल. मुळातच, बीएसएनएलमुळे मिनिटाला 16 रुपयांवरून 1 रुपया संवाद शुल्क झाले आहे. तसेच 20 वर्षांपूर्वी बीएसएनएलने ऑप्टिकल फायबर केबलचा उपयोग केला आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान अडीच हजारांहून अधिक केबल टाकण्यात आल्या आहेत.

बीएसएनएलवर खेळते भांडवल आणि 2 ते 3 हजार कोटींचे कर्ज वगळता कर्ज नाही. मात्र, मालमत्ता आणि मनुष्यबळ ही मोठी गुंतवणूक आहे. टेलिकॉममधील इतर कंपन्यांकडे 4 लाख कोटी कर्ज आहे. इतर कंपन्यांचा शेअर मार्केट घसरत असताना बीएसएनएल चा शेअर मार्केट 0.3 % नी वाढले आहे, देशात 10 % शेअर बीएसएनएलचा असून 1% वाढीचे उद्दिष्ट आहे, असेही महाजन यांनी सांगितले.

Web Title: Marathi news bsnl news nitin mahajan coffee with sakal Nashik news