अवास्तव योजनांना फाटा देत दिड हजार कोटींहुन अधिक आयुक्तांचे बजेट सादर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नाशिक : सन 2018-19 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात अवास्तव योजनांना फाटा देत लोकोपयोगी योजनांचा समावेश करतं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 1785 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आज स्थायी समितीला सादर केले. अंथरून पाहून पाय पसरावे या म्हणीला साजेसे आर्थिक नियोजन करतांना शहर वासियांना चोविस तास पाणी पुरवठा, शाश्‍वत बससेवा, नवीन वसाहतींमध्ये पथदीप, रस्ते, ड्रेनेज सुविधा देण्याबरोबरचं महापालिकेचा कारभार डिजीटल करण्यावर भर दिला आहे.

नाशिक : सन 2018-19 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात अवास्तव योजनांना फाटा देत लोकोपयोगी योजनांचा समावेश करतं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 1785 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आज स्थायी समितीला सादर केले. अंथरून पाहून पाय पसरावे या म्हणीला साजेसे आर्थिक नियोजन करतांना शहर वासियांना चोविस तास पाणी पुरवठा, शाश्‍वत बससेवा, नवीन वसाहतींमध्ये पथदीप, रस्ते, ड्रेनेज सुविधा देण्याबरोबरचं महापालिकेचा कारभार डिजीटल करण्यावर भर दिला आहे.

विद्यार्थी केंद्रभुत मानून पालिकेच्या शाळा डिजिटल करण्याबरोबरचं स्वच्छतेसाठी कचरा विलगिकरण बंधन कारक केले आहे. दिव्यांग, महिलांसाठी योजनांचा समावेश करताना विनाअडथळा सुरक्षित प्रवासाचे आश्‍वासन देवून प्रदुषण मुक्त नाशिकसाठी सायकल व जॉगिंग ट्रॅक, प्रोजेक्‍ट गोदाच्या माध्यमातून प्रदुषण मुक्त नदी व उत्पन्नाचे साधन महापालिकेला उपलब्ध करून देण्याचा निश्‍चय केला आहे. 

स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आयुक्त मुंढे यांनी सन 2017-18 चे सुधारीत व 2018-19 चे अंदाजपत्रक सादर केले. महापालिकेच्या उत्पन्नात 331 कोटी 75 लाख रुपये एवढ्या रक्कमेची वाढ करून 1783.24 कोटी रुपयांचे 1.91 कोटी रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले. मागील आर्थिक वर्षात 1453 कोटी 40 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. मालमत्ता कर वाढ व सर्वेक्षणातून आढळून आलेल्या अतिरिक्त मालमत्तांवर लावला जाणारा कर, कम्पाऊंडींग स्ट्रक्‍चर व पालिकेच्या मिळकती रेडीरेकनर दराप्रमाणे देण्याचा निर्णय घेतल्याने हि जमेची बाजू गृहीत धरून अंदाजपत्रकात वाढ करण्यात आली आहे. 

पालिकेच्या उत्पन्नाच्या बाजु 
महापालिकेचा 1785 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करताना एलबीटी अनुदानातून 967 कोटी 26 लाख रुपये उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे. घरपट्टीतून 253.69 कोटी, विकास करातून 69.40 कोटी, सेवा सुविधांपासून 153.98 कोटी, पाणीपट्टीतून साठ कोटी रुपये उत्पन्न गृहीत धरले आहे. महसुली खर्च 638 कोटी रुपये तर भांडवली कामांसाठी 650 कोटी रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. 26 कोटी रुपयांचा खर्च देखभाल दुरुस्तीसाठी होणार आहे. पालिकेचे सध्याचे सुमारे 550 कोटी रुपयांचे दायित्व कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. 

महत्वकांक्षी योजना 
- शहर बससेवेसाठी तीस कोटी रुपयांची तरतुद. 
- विनाअडथळा चालण्यायोग्य शहर बनविणार. 
- गावठाण भागात 24 तास पाणी पुरवठा. 
- गावठाणात 101 तर नवनगरांत 102 किलोमीटरच्या नवीन पाईपलाईन. 
- नवीन वसाहतीत कच्चे, जेथे खडीचे रस्ते तेथे पक्के रस्ते करणार. 
- शहरात 3750 नवीन विद्युत पोल उभारणार. 
- कृषी नगर सह शहरात सायकल व जॉगिंग ट्रॅक. 
- 128 कोटी रुपयांतून गोदावरी विकास. 
- 28 ठिकाणी ऑफ स्ट्रीट तर पाच ठिकाणी ऑनस्ट्रीट पार्किंग. 
- पाण्याचा अचुक वापर नोंदविण्यासाठी स्काडा तंत्रज्ञानाचा वापर. 
- महापालिकेचे डिजिटायजेशन. 
- अपंगांसाठी डिटेक्‍शन सेंटर. 
- मखमलाबाद व कामटवाडे येथे नवीन मलनिस्सारण केंद्रे. 
- क्रिडांगणे व उद्यानांचा थीम बेस वर विकास. 
- वीज महावितरण प्रमाणे पाण्याची देयके. 
- सिंहस्थ भुसंपादनासाठी शंभर कोटींची तरतुद. 
- शहराते शेअरींग सायकल उपक्रम. 
 

Web Title: marathi news budjet 2018-19