शहरातील साडे तीनशे बसथांब्यांची पुर्नरचना 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

नाशिक : राज्य परिवहन महामंडळा ऐवजी महापालिके मार्फत बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत सादर होत असताना दुसरीकडे बससेवा सुरु होईलचं या विश्‍वासावर प्रशासनाकडून अंमलबजावणीची तयारी सुरु झाली असून त्याचाचं एक भाग म्हणून नाशिककरांना बससेवा देताना थांब्यांची देखील पुर्नरचना केली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने शहरात साडे तीनशे हून अधिक बसथांबे सुरु केले आहेत. त्या सर्व थांब्यांची पुर्नरचना केली जाणार आहे. 

महापालिकेतर्फे पीपीपी तत्वावर बससेवा सुरु केली जाणार आहे. येत्या महासभेत त्यासाठीचा प्रस्ताव सादर होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने अंमलबजावणीची तयारी सुरु केली आहे. बससेवा सुरु करताना शहरात बारा मीटरच्या दिडशे तर नऊ मीटर रुंदीच्या दिडशे अशा तीनशे बसेस मक्तेदारामार्फत चालविल्या जातील. बससेवेच्या पायाभुत सुविधा मक्तेदारामार्फत तर तिकिटाचे दर ठरविणे व वसुली महापालिकेच्या वतीने केली जाणार आहे. सेवा पुरविताना आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर केला जाणार असून नागरिकांना ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बसेसचा मार्ग व घंटागाडी प्रमाणेचं दहा मिनिटे अगोदर ठराविक बसेसचा ऍलर्ट मिळणार आहे. हवा व ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी ईलेक्‍ट्रॉनिक्‍स बसेस मक्तेदार कंपनीला बंधनकारक असून त्यासाठी शहरात महापालिका 50 चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. सेवा निरंतर व नफ्यात चालावी तसेच नागरिकांना सुविधा मिळाव्या म्हणून बसथांब्यांची पुर्नरचना केली जाणार आहे. 

350 थांब्यांची पुर्नरचना 
राज्य परिवहन महामंडळातर्फे गेल्या चाळीस वर्षांपासून शहरात सेवा दिली जात आहे. शहराचा विस्तार होत असतांना वाहतुकीवरचा ताण वाढला. टप्प्याटप्प्याने बसेसची संख्या वाढली. शहरात एसटी तर्फे 240 बसेस चालविल्या जात होत्या. बसेसची संख्या वाढल्याने बस थांब्यांची देखील संख्या वाढली शहराच्या सहा विभागात एकुण 350 पेक्षा अधिक बस थांबे निर्माण करण्यात आले. काही थांबे फायद्यात तर काही थांबे तोट्यात होते. बससेवेच्या नव्या धोरणानुसार 210 मार्ग निश्‍चित केले जाणार असून त्यात प्रवाशांची संख्या अगदी कमी असलेले थांबे रद्द करून त्याऐवजी नवीन थांब्यांची निर्मिती केली जाणार आहे. 

Web Title: marathi news bus stops