बीव्हीजी' ग्रुप देणार तनिष्कांना व्यवसायाची संधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

सकाळ वृत्तसेवा 
नाशिक, ता. 28 : "सकाळ' माध्यम समूहाचे "तनिष्का' स्त्री प्रतिष्ठा अभियान हे महिलांचे उत्तम व्यासपीठ आहे. महिलांना आर्थिकदृष्या सबल करण्यासाठी "तनिष्का'च्या माध्यमातून होत असलेले उपक्रम उपयुक्‍त आहेत. भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) सध्या विषमुक्‍त शेतीतून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. या अभियानात "तनिष्कां'ना सहभागी करून घेतांना कृषी व सेवा क्षेत्रात "तनिष्का' सदस्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे प्रतिपादन बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी शुक्रवारी (ता.28) केले. 

"सकाळ'च्या सातपुर कार्यालयात भेटीप्रसंगी श्री. गायकवाड यांनी तनिष्का भगिणींशी संवाद साधतांना त्यांना व्यवसायात यशस्वी होण्यासाठीच्या टिप्स्‌ दिल्या. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी श्री. गायकवाड यांचे स्वागत केले. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, बीव्हीजी ग्रुपचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब कंकराळे, प्रगतशील शेतकरी श्री.आहेर आदींसह बीव्हीजीच्या तनिष्का सदस्या उपस्थित होते. 

श्री. गायकवाड म्हणाले, की पुढील बारा वर्षांत 10 कोटी लोकांचा जीवनमान बदलविण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवत आहेत. कर्करोगासह अन्य विविध आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विषमुक्‍त शेती करतांना, उत्पादकता वाढविण्याचे धेय्य ठेवले आहे. त्यासाठी अल्पदरात माती परीक्षण व पाणी परीक्षण करून दिले जात आहे. तनिष्का व्यासपीठ ग्रामीण तसेच शहरी भागात कार्यरत असल्याने ग्रामीण भागात कृषी उत्पन्न विषमुक्‍त करणे तर शहरी भागात तनिष्का सदस्यांच्या मदतीने वितरणाची साखळी तयार करत नाशिक येथे राबविलेला उपक्रम पथदर्शी ठरू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्‍त केला. 

सर्वोत्तमतेचा ध्यास ठेवा 
उपस्थित तनिष्का भगिणींना श्री. गायकवाड यांनी यशस्वी व्यवसायासाठीच्या टिप्स्‌ दिल्या. कुठलेही काम करतांना सर्वोत्तमतेचा ध्यास बाळगावा. दर्ज्यात सातत्ये ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेच्या युगात अपेक्षित बदल आत्मसात करावे, असे त्यांनी नमुद केले. सोबतच बीव्हीजी ऑगॅनिक, खिचडी एटीएम यांसह आगामी काळात येऊ घातलेल्या विविध संकल्पनांविषयीची माहिती त्यांनी दिली. 

आदिवासी भागातील आरोग्य सेवेसाठी रूग्णवाहिका 
तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून त्र्यंबकेश्‍वरसह अन्य आदिवासी बहुल भागात आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम राबविला जातो आहे. या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी बीव्हीजी ग्रुपतर्फे रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुसज्ज अशा या रूग्णवाहिकेच्या माध्यमातून आदिवासी पाड्यांवर अधिक प्रभावीपणे आरोग्य सेवा पोहचविण्यास मदत होणार आहे. 

Web Title: marathi news bvg group hanumant gaikwad discussion