कर्करोगाच्या क्लिष्ट शस्त्रक्रियेतून रूग्णाची अखेर सुटका....श्री गुरूजी रूग्णालयाचा पुढाकार

live
live

नाशिक इगतपुरी जवळील पाड्यांवर राहणाऱ्या एका पन्नास वर्षीय रूग्णांच्या छातीच्या पुढच्या हाडावर कॅन्सरची गाठ होती, सहा महिन्यांपासून तो या त्रासाने त्रस्त होता. केमोथेरथी व रेडीओथेरपीला ही गाठ प्रतिसाद देत नसल्याने शस्त्रक्रीया करण्याशिवाय दुसरा पर्याय रूग्णांसमोर नव्हता. कौटुंबिक हलाखीची रिस्थिती,उपचार,शस्त्रक्रियेसाठीचा मोठा खर्चामुळे त्याला पुढील उपचार घेणे शक्‍य होत नव्हते मात्र येथील श्री गुरुजी रूग्णालयाच्या डॉक्‍टरच्या चमुने निस्वार्थी,आपुलकीच्या वैद्यकीय सेवेतून कॅन्सरच्या या गाठीची अत्यंत दुर्मिळ,गुंतागुतींची शस्त्रक्रीया नुकतीच केली.

 पाच तास चाललेल्या या शस्त्रक्रियेसाठी नियोजन केले होते.कर्क    रोगतज्ञ,भूलतज्ञ,प्लॉस्टीक,फिजीओथेरपिस्ट तज्ञ यासारख्या सहकार्य लाभले. रूग्णाच्या तब्बेतीत सुधारणा होऊन त्याला घरी सोडण्यात आले आहे. 

सर्व तपासण्यानंतर पुढील निर्णय

दोन महिन्यापूर्वी पाड्यावरील हा रूग्ण श्री गुरुजी रूग्णालयात दाखल झाला. सर्व तपासण्यानंतर त्यांच्या छातीच्या पुढच्या हाडावर(sternum) कॅन्सरची गाठ( chondrosarcoma)होती. अधिक चौकशीनंतर सहा महिन्यापासून त्याला त्रास होत होता व त्यासाठी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये तो जाऊन जाऊन आला. मात्र पैसे नसल्याने योग्य ते उपचार त्यांच्यावर झाले नाही. सर्व तपाण्यानंतर कॅन्सर गाठ छातीच्या पुढच्या हाडापासून सुरवात होऊन उजव्या बाजूच्या पहिल्या व दुसऱ्या बरगड्यांना तसेच कॉलर बोनला गाठीने विळखा घातल्याचे लक्षात आले. हि गाठ हाताची मुख्य रक्तवाहिनी व हदयाची मुख्य अशुध्द रक्तवाहिनी(superior veincava) यांना चिकटलेली होती. या प्रकारच्या कॅन्सरच्या गाठी खूप दुर्मिळ असतात. 

संसर्गजन्य आणि फुप्फुसावर परिणामाचा धोका 
श्री गुरुजी रूग्णालयाच्या डॉक्‍टरांच्या चमूने शस्त्रक्रियेदरम्यान कॅन्सरची गाठ मुख्य रक्तवाहिन्या तसेच उजव्या फुप्फुसापासून सोडवली गेली व गाठीबरोबरच छातीचे पुढचे हाड,उजव्या बाजूची पहिली व दुसरी बरगडी आणि कॉलर बोनचा काही भाग काढावा लागला. शस्त्रक्रियेनंतर चेस्ट बॉलला स्थैर्यता मिळणेही तितकेच महत्वाचे होते,अन्यथा रूग्णाला श्‍वसनाचा त्रास तसेच कुठल्याही प्रकारचे संसर्ग(इन्फेक्‍शन) आणि त्यामुळे फुप्फुसावर गंभीर परिणामाचा धोका होता. हा धोका टाळण्यासाठी प्लास्टीक सर्जरीद्वारे मेश,बोन सिमेंट आणि छातीवरची त्वचा व स्नायू वापरून छातीची घडण पूर्ववत करण्यात आली. 

मंजूर खर्चात शस्त्रक्रिया पूर्ण 
या रूग्णास राज्य सरकारच्या महत्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत उपचारासाठी दाखल केले मात्र ही शस्त्रक्रिया खूप मोठी व क्‍लिष्ट होती. त्यातअनेक डॉक्‍टर्स सहभागी झाले होते. त्यामुळे उपचारांचा खर्च हा मंजुर झालेल्या खर्चापेक्षा खूप जास्त होता. तरी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या खर्चातच श्री गुरुजी रूग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारांसाठी पूर्णवेळ कॅन्सर सर्जन डॉ.अमोघ काळे यांनी डॉक्‍टर्सच्या टिमचे नेतृत्व केले. डॉ.काळे व डॉ.विजय मालपाठक यांनी ही शस्त्रक्रीया पार पाडली. प्लास्टीक सर्जन डॉ.निलेश पाटील,भूलतज्ञ डॉ.अमोल कदम आणि डॉ.निलिमा कदम,अतिदक्षता विभागात डॉ.सचिन देवरे आणि फिजिओथेरेपिस्ट डॉ.सोनाली खैरे डॉ.भारती पवार,यांचे सहकार्य मिळाले. कर्करोगतज्ञ डॉ.गिरीष बेंद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com