जात वैधता प्रमाणपत्र सादरीकरणासाठी मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नाशिक : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. प्रमाणपत्र सादरीकरणास दिलेली मुदत शुक्रवारी (ता.10) संपली. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रमाणपत्र सादरीकरणासाठी मंगळवार (ता.14)पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यात विविध अभ्यासक्रमांतील 6 हजार 034 विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र प्रलंबित आहेत. 

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा चिघळला होता. बहुतांश विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने अभ्यासक्रम प्रवेशासाठीचा ऑनलाईन फॉर्म भरतांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठीची पावती ग्राह्य धरली होती. तसेच सदरचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अभ्यासक्रमनिहाय अंतीम दिनांक जाहीर केली होती. विविध अभ्यासक्रमास प्रवेशासाठी अर्ज केलेल्या 6 हजार 034 विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत. प्रथम वर्ष अभियांत्रिकी, बी. फार्म., फार्म डी., बी.आर्क., हॉटेल मॅनेजमेंट, तसेच एमबीए, एमएमएस या अभ्यासक्रमांकरीता जात वैधता प्रमाणपत्र सादरीकरणाची अंतीम मुदत शुक्रवार (ता.10) पर्यंत होती. या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना आता मंगळवार (ता.14) पर्यंत प्रमाणपत्र सादर करता येतील. 

कर्मचारी संपामुळे मुदतवाढीचा निर्णय 
7 ते 9 ऑगस्ट या कालावधीत राज्य शासकीय कर्मचारी संपावर असल्याने जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याच्या कामावर त्याचा परीणाम झाल्याचे, सीईटी सेलने मान्य केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने जात वैधता प्रमाणपत्र सादरीकरणासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 

एसएमएस, ई-मेलद्वारे कळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 
पाच अभ्यासक्रमांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र अपलोड केलेले नाही, अशा सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अपलोड करण्याबाबत एसएमएस, ई-मेलद्वारे सूचित करावे, अशा सूचना नोडल अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 
 
Web Title: marathi news cast certificate limit increased