हि दोस्ती तुटायची नाय... बेवारस मांजरींना आसरा देणारे बिल्लीवाले इस्माईलभाई

आनंद बोरा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

नाशिकः स्थळ..भद्रकाली लोखंड मार्केट.... वेळ- सकाळची.....पांढरी दाढी वाढलेला एक इसम रोजच सर्वांचे लक्ष वेधून घेतो.  याला कारणही तसेच आहे .या व्यक्ती बरोबर रस्त्याने त्यांची सोबत करतात चक्क बेवारस मांजरी.....आश्‍चर्य वाटले ना..पण हे खरे आहे. या परिसरात बिल्ली वाले इस्माईलभाई म्हणून ते परिचित आहे.

नाशिकः स्थळ..भद्रकाली लोखंड मार्केट.... वेळ- सकाळची.....पांढरी दाढी वाढलेला एक इसम रोजच सर्वांचे लक्ष वेधून घेतो.  याला कारणही तसेच आहे .या व्यक्ती बरोबर रस्त्याने त्यांची सोबत करतात चक्क बेवारस मांजरी.....आश्‍चर्य वाटले ना..पण हे खरे आहे. या परिसरात बिल्ली वाले इस्माईलभाई म्हणून ते परिचित आहे.

   गेल्या सात वर्षापासून हा माणूस बेवारस मांजरीची मैत्री जमली असून त्यांची ते सेवा करीत आहे मुकया प्राण्याना मदत केल्यास अल्ला काही कमी पडू देत नाही असा त्याचा विश्वास आहे. भद्रकाली येथील लोखंड मार्केट मध्ये पत्र्याचा हा कारागीर..दिवस भर काबड कष्ट करून घाम गाळुन त्याला मिळतात दीडशे रुपये..पण हा माणूस घरची परिस्थिती गरीबीची असतांना आपल्या घामाच्या वाट्यातील निम्मी रक्कम या मांजरीच्या दाना- पाणी साठी खर्च करतो.

   रोज सकाळी दीड लिटर दूध आणि संध्याकाळी मासे हे न चुकता तो या बेवारस मांजरिंसाठी आणतात. आज ते जेथे काम कारतात त्या ठिकाणी तब्बल वीस मांजरांशी त्यांची दोस्ती झाली आहे.

    इस्माईलभाईचे येण्याची व जाण्याची वेळ त्यांना माहीत झाली आहे. ज्यावेळी ते मार्केट मध्ये प्रवेश करतात त्यावेळी चक्क या बेवारस मांजरी त्यांच्या समवेत चालू लागतात जणू त्यांना ते सलामीच देतात असे वाटते त्यांनी या मांजारींना वेगवेगळी नावे देखील ठेवली आहे आवाज दिला की एका मिनिटा च्या आत या मांजरी हजर..आजच्या युगात जवळचे नाते दूर होत चालले असताना अश्‍या घटना माणुसकी जिवंत असल्याचे नक्कीच पटवून देतात.

मी गेल्या सात वर्षा पासून बेवारस मांजरींशी मैत्री केली आहे यांच्या मैत्र मुळे मला मानसिक समाधान खूप मोठे मिळते मी पैशाने गरीब असेल पण माणूसकिने करोडपती आहे या मांजरींना रोज न चुकता दूध आणि मासे मी देत आहे प्राण्याना प्रेमाची भाषा खूप चांगली समजते हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे केवळ यांच्याशी केलेल्या दोस्तीमुळे...- इस्माईलभाई 
 

Web Title: marathi news cat and ismailbhai

टॅग्स