सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, संकेतस्थळाच्या धिम्म गतीने दमछाक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

नाशिक : इयत्ता बारावीचा सीबीएसई बोर्डाचा निकाल शनिवारी (ता.26) ऑनलाईन स्वरूपात जाहीर झाला आहे. सकाळी अकराच्या सुमारास सीबीएसई बोर्डाचे संकेतस्थळ हॅंग झाल्याने निकाल शोधण्यात विद्यार्थी पालकांना परीश्रम घ्यावे लागले. त्यातच शनिवार असल्याने शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडीत झाल्याने निकालाची प्रत मिळविण्यासाठी विद्यार्थी पालकांची दमछाक झाली. 

नाशिक : इयत्ता बारावीचा सीबीएसई बोर्डाचा निकाल शनिवारी (ता.26) ऑनलाईन स्वरूपात जाहीर झाला आहे. सकाळी अकराच्या सुमारास सीबीएसई बोर्डाचे संकेतस्थळ हॅंग झाल्याने निकाल शोधण्यात विद्यार्थी पालकांना परीश्रम घ्यावे लागले. त्यातच शनिवार असल्याने शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडीत झाल्याने निकालाची प्रत मिळविण्यासाठी विद्यार्थी पालकांची दमछाक झाली. 

केंद्रीय विद्यालय, नाशिकरोड 
नाशिकरोड येथील केंद्रीय विद्यालय, आयएसपी या शाळेचा निकाल 98.33 टक्‍के लागला आहे. शाळेतील 60 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 59 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून ऋतुजा मदनकर (92.6 टक्‍के) प्रथम, सदाशिव कांबळे (90 टक्‍के) द्वितीय तर सुदर्शन झाडे (85.4 टक्‍के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर वाणिज्य शाखेतून स्नेहा भालेराव (87.4 टक्‍के), सोनाली जामनिक (81.2 टक्‍के) द्वितीय, नयन चौधरी (77 टक्‍के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. 

सिम्बॉयसिस शाळेचा निकाल 
सिम्बॉयसिस शाळेचा शंभर टक्‍के निकाल लागला आहे. परीक्षेला बसलेले सर्व 31 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी तिघा विद्यार्थ्यांनी 91 ते 95 टक्‍के गुण, सहा विद्यार्थ्यांनी 81 ते 90 टक्‍के गुण तर 17 विद्यार्थ्यांनी 71 ते 80 टक्‍के गुण मिळविले आहे. शाळेतून अनुजा टिपरे हिने (95.7 टक्‍के) प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुकूल अचवाल (93.8 टक्‍के) द्वितीय, सलोनी खन्ना (93.4 टक्‍के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. इंग्रजी विषयात पीयुष वाघ याने 95 गुण तर अनुजा टिपरे, मुकुल अचवाल व सलोनी खन्ना यांनी भौतिकशास्त्र विषयात 95 गुण मिळविले आहे. रसायनशास्त्रात अनुजा व मुकुलने 95 गुण मिळविले असून अनुजाने गणितात 98 गुण मिळविले आहे. जीवशास्त्रात स्मृती शेळके हिने 91 गुण मिळविले आहे. शारीरीक शिक्षण विभयात अनुजा, सलोनी व अनुष्का यांनी 99 गुण मिळविले आहेत. 

नाशिक केब्रीज स्कूल 
नाशिक केब्रीज स्कूलचा निकाल शंभर टक्‍के लागला आहे. विज्ञान शाखेतून कनिष्ठ विद्यालयात सर्व 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सोहम विठ्ठल गायकवाड (95.6 टक्‍के) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रृती संभाजी पवार हिने 95.4 टक्‍के गुण मिळवत द्वितीय तर प्रेक्षा सतीश फडके हिने 94 टक्‍के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

Web Title: marathi news cbsc result