नाशिकचे पोलिस आयुक्तालय सीसीटिव्ही कॅमेराविना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

नाशिक : पोलीस कोठडीत होणारे मृत्यु रोखण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने राज्यातील 1100 पोलीस ठाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षात आणण्यासाठी 72 कोटी 60 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविताना स्मार्ट पोलीस ठाण्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वंचित राहिलेले नाशिक पोलीस आयुक्तालयास याचा लाभ होणार आहेच. शिवाय जिल्ह्यातील 40 पोलीस ठाणेही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षात येणार आहेत. 

गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस ठाण्यातील कोठडीमध्ये कैद्यांचा मृत्यु होण्याचे प्रकार वाढले आहेत. यापार्श्‍वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस कोठडींमधील मृत्यु रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील 25 पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. परंतु राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भातील कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे गृहविभागाने त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव पारीत करीत, त्यासाठीच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार, राज्यातील 1100 पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 72 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे दोन टप्प्यात बसविले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये स्मार्ट पोलीस ठाण्यांचा प्राधान्य दिले जाणार आहे. 

दरम्यान, नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 14 पोलीस ठाण्यांपैकी 13 पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. तर सायबर पोलीस ठाणे हे पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीमध्येच कार्यरत असल्याने याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मात्र सदरचे पोलीस ठाणे लवकरच मुख्यालयातील स्वतंत्र जागेत स्थलांतरित होणार असल्याने त्याठिकाणी मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 
 
पोलीस आयुक्ताल कॅमेरेविना 
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. याच इमारतीमध्ये काही महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या इसमाने आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. त्यापार्श्‍वभूमीवर आयुक्तांच्या दालनाबाहेर काचेची तावदाने बसविण्यात आली आहेत. परंतु अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नसून ते प्रस्तावित आहेत. शासनाच्या निर्णयामुळे पोलीस आयुक्तालयाही लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत येणार आहे. 
 
जिल्ह्यातही आवश्‍यकता 
नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे जिल्ह्यात 40 पोलीस ठाणे आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भातील सर्वेक्षणात 170 कॅमेऱ्यांची आवश्‍यकता असताना सध्या 87 कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील एकाही पोलीस ठाण्यात पूर्णक्षमतेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. प्रत्येक ठाण्यात एका वा दोनच कॅमेरे आहेत. त्यामुळे शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना लाभ होण्याची शक्‍यता असून किती कॅमेरे मिळतात याकडे लक्ष आहे. 

पोलिस उपायुक्त  माधुरी कांगणे म्हणाल्या, जवळपास सर्वच पोलीस ठाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षात आहेत. लवकरच आयुक्तालयातही कॅमेरे बसविले जातील. 

Web Title: marathi news cctv camera in cp office