सिमेंट गोणी दरात साठ रुपयांनी वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

नाशिक : जिल्ह्यात रेती वाहतुकीवर बंदी असल्याने बांधकामे ठप्प झाल्याने त्यात आता आणखी सिमेंट दरवाढीची भर पडली आहे. मार्च अखेरीस कंपन्यांनी अकाऊंट बंद केल्यानंतर एक एप्रिल पासून नवे दर लागु केल्याने गोणी मागे तब्बल साठ ते बासस्ट रुपये वाढ करण्यात आल्याने त्याचा परिणाम बांधकामांवर होताना दिसतं आहे. 

नाशिक : जिल्ह्यात रेती वाहतुकीवर बंदी असल्याने बांधकामे ठप्प झाल्याने त्यात आता आणखी सिमेंट दरवाढीची भर पडली आहे. मार्च अखेरीस कंपन्यांनी अकाऊंट बंद केल्यानंतर एक एप्रिल पासून नवे दर लागु केल्याने गोणी मागे तब्बल साठ ते बासस्ट रुपये वाढ करण्यात आल्याने त्याचा परिणाम बांधकामांवर होताना दिसतं आहे. 

गेल्या तीन ते चार वर्षांपासून शहरातील बांधकाम व्यवसायात अनेक चढ-उतार पाहायला मिळतं आहे. डेपोतील कचऱ्याची विल्हेवाट लागतं नसल्याने राष्ट्रीय हरित लवादाने शहरातील बांधकामांवर एक वर्ष बंदी आणली होती. त्यानंतर बांधकामातील कपाटांचा वाद निर्माण झाला अद्यापही तोडगा निघाला नाही. नवीन शहर विकास आराखड्यात जादा एफएसआय मिळाला परंतू सहा व साडे सात मीटर रुंदीच्या रस्त्यांवर टिडीआर वापरण्यास शासनाने बंदी आणल्याने त्याचा थेट परिणाम बांधकामांवर झाला.

शासनाची टिडीआर पॉलिसी, ऑटो डिसीआर मधील त्रुटी या सारख्या विविध कारणांमुळे बांधकाम व्यवसाय डबघाईस आला. नोटाबंदी, जीएसटीमुळे तर अनेकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. शासनाने गेल्या वर्षी महारेरा कायदा संमत केल्याने त्याद्वारेचं आता बांधकाम प्रकल्प उभे राहणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्प उभे करायचे कि कागदे रंगवायची असा प्रश्‍न निर्माण झाला.

  जिल्ह्यात रेती ठिय्यांचे लिलाव न झाल्याने बांधकामावर वॉश सॅण्ड अर्थात कृत्रिम रेती वापरण्याची वेळ आली. कृत्रिम रेती देखील महाग झाल्याने त्याचा परिणाम घरांच्या किमती वाढण्यावर होत आहे. मराठवाडा व विदर्भातील स्टील उत्पादक कंपन्यांना विज दरात सवलतं दिल्याने नाशिक मधील स्टील कंपन्यांचे उत्पादन घटले. त्याचा परिणाम स्टीलचे दर वाढण्यात झाला. अशा प्रकारच्या अनेक समस्यांचा सामना करतं असताना अथक प्रयत्नांतून व्यवसाय टिकविलेल्या व्यावसायिकांना नव्या आर्थिक वर्षात स्थिरस्थावर होईल अशी आशा होती

आर्थिक वर्षाच्या पहिल्याचं महिन्यात सिमेंट गोणीच्या दरात साठ ते 62 रुपये दरवाढ करण्यात आली. गेल्या महिन्यात 250 ते 270 च्या आसपास असलेले सिमेंट गोणीचे दर आता सव्वा तीनशे रुपयांपर्यंत पोहोचल्याने बांधकामे महागणार आहेत. 

तेच दर राहणार कायम 
गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील बांधकाम प्रकल्प सिमेंटचे दर कमी होण्याच्या आशेने थांबले आहेत. परंतू सरकारच्या धोरणामुळे किमती वाढल्याचा दावा करतं यापुढे तेच दर कायम राहतील असा दावा सिमेंट विक्रेत्यांनी केला आहे. 
 

Web Title: marathi news cement price