सर्व्हर ठप्प पडल्याने दिवसभर दाखल्यांचे वांदे , ऐन प्रवेशात  दाखल्यांचा खोळंबा   

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

नाशिक ः शाळा-महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या दिवसात बुधवारी रात्रीपासून सर्व्हर बंद पडल्याने जिल्ह्यात एका दिवसांत 28 हजारावर दाखले अडकून पडले होते. रात्रीपासून पंधरा-सोळा तासात बंद पडलेल्या सर्व्हरमुळे गुरुवारी दुपारपर्यत जिल्हाभरातून एकही दाखला वितरित झालेला नव्हता. 

नाशिक ः शाळा-महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या दिवसात बुधवारी रात्रीपासून सर्व्हर बंद पडल्याने जिल्ह्यात एका दिवसांत 28 हजारावर दाखले अडकून पडले होते. रात्रीपासून पंधरा-सोळा तासात बंद पडलेल्या सर्व्हरमुळे गुरुवारी दुपारपर्यत जिल्हाभरातून एकही दाखला वितरित झालेला नव्हता. 

शाळा महाविद्यालयात प्रवेशाची प्रक्रिया सगळीकडे जोरात सुरु झाली आहे. आभियांत्रिकी, वैद्यकिय प्रवेशासाठी ठिकठिकाणच्या केंद्रावर विद्यार्थी-पालकांच्या रांगा लागल्या आहेत. आठवड्यापासून दाखल्यांसाठी प्रतिक्षेत चकरा मारणाऱ्या विद्यार्थी - पालकांवर चोवीस तासापासून पून्हा हातावर हात ठेउन बसण्याची वेळ आली आहे. रात्रीपासूनच सरकारी सर्व्हर ठप्प झाले आहे.

   केवळ नाशिकच नव्हे तर राज्यातील ठिकठिकाणी असेच चित्र असल्याने चोवीस तासांपासून एकही दाखला मिळू शकलेला नाही. सर्व्हरवर 
केवळ कामकाज सुरु होण्याची प्रतिक्षा करण्याशिवाय कुठलेही कामकाज सुरु नाही.आपले सरकार, महाऑनलाईनसह विविध यंत्रणावर मात्र दाखल्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या 28 हजारावर पोहोचली होती. 

नाशिक शहरात नित्यनेमाने आठ ते दहा हजारावर दाखल्यासाठी अर्ज येतात. ग्रामीण भागातून अर्ज करणाऱ्यांची संख्या साधारण एवढीच आहे. आतापर्यत दाखल्यांवर स्वाक्षऱ्या होण्यास विलंब होत होता मात्र आता आधिकारी कामाला लागले असतांना सर्व्हरच्या तांत्रीक अडचणीत भर पडली आहे. बुधवारी रात्रीपासून सर्व्हर कामच करीत नसल्याने शहर-जिल्ह्यातील केंद्रावरुन जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व्हरच्या अडचणीविषयीचा तक्रारीचा पाउस सुरु होता. सर्व्हर जाम झाल्याने विद्यार्थी-पालक त्रस्त झाले आहेत. 

सर्व्हरचा तांत्रीक अडचण असल्याने दुपारपर्यत अडचणी आल्या. पण दुपारनंतर सर्व्हर पूर्ववत सुरु झाला आहे. विविध डेस्कर प्रलंबित असलेल्या दाखल्यांचा निपटारा 
करण्याचे काम सुरु होते. उद्यापर्यत प्रलंबित दाखले मिळतील. 
-अरविंद अंतुर्लीकर (उपजिल्हाधिकारी प्रशासन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news certificate problem