विभागातील 51 हजार विद्यार्थी देणार आज सीईटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नाशिक : इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी (बी.ई.), औषधनिर्माणशास्त्र (बी.फार्म), बी. एस्सी. (कृषी) आदी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उद्या (ता.10) राज्यात एमएचटी-सीईटी परीक्षा होत आहे. नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासह धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतून 51 हजार विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. परीक्षेला सकाळी सव्वा नऊपासून सुरवात होईल. प्रत्येकी दीड तास कालावधीचे तीन पेपर दुपारी साडे चारला संपेल.

नाशिक : इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी (बी.ई.), औषधनिर्माणशास्त्र (बी.फार्म), बी. एस्सी. (कृषी) आदी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उद्या (ता.10) राज्यात एमएचटी-सीईटी परीक्षा होत आहे. नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासह धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतून 51 हजार विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. परीक्षेला सकाळी सव्वा नऊपासून सुरवात होईल. प्रत्येकी दीड तास कालावधीचे तीन पेपर दुपारी साडे चारला संपेल.

    राज्य सामाई प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटी परीक्षेचे संयोजन केले जाते. परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे तयारी करण्यात आलेली आहे. अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यापूर्वीपर्यंत ही परीक्षा घेतली जात होती. यात यंदाच्या वर्षी प्रथमच बी. एस्सी. (कृषी) या अभ्यासक्रमाचाही समावेश केला आहे. राज्यभरातून 4 लाख 35 हजार 606 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले असून नाशिक विभागातून प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 51 हजार इतकी आहे. 

  जेईई मेन्स, नीट परीक्षेनंतर आता राज्यभरातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेची प्रतिक्षा होती. नीट परीक्षा पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी सीईटीच्या अभ्यसावर लक्ष केंद्रीत केले होते. या परीक्षेत इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत वीस टक्‍के तर उर्वरित ऐंशी टक्‍के प्रश्‍न बारावीच्या अभ्यासक्रमावर विचारले जाणार आहेत. वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्‍न परीक्षेत असणार आहेत. 

या गोष्टी स्वत:जवळ असू द्या.
परीक्षेला जातांना विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र स्वत:जवळ ठेवावे. तसेच काळ्या रंगाचा बॉल पॉंईंट पेन, क्‍लीप बोर्ड सोबत ठेवावा. दिव्यांग विद्यार्थ्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र बाळगावे. तर विद्यार्थ्यांनी ओळखपत्राकरीता आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचे लायसन्स, मतदार ओळखपत्र, बॅंकेचे पासबुक आदींची मुळ प्रत स्वत:सोबत आणायची आहे. 

या गोष्टी घेऊन जाऊ नका 
विद्यार्थ्यांनी मॅथेमॅटीकल टेबल स्वत:सोबत घेऊन येऊ नये. ते प्रश्‍नसंचासोबत पुरविले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट, कॅक्‍युलेटर, मोबाईल फोन, घड्याळ आदी वस्तू विद्यार्थ्यांनी केंद्रावर घेऊन जाऊ नये. 

असे आहे परीक्षेचे वेळापत्रक 
मॅथेमॅटीक्‍स (पेपर 1) 
परीक्षा केंद्रावर प्रवेशाची मुदत------------------------सकाळी 9.15 ते 10 
ओएमआर शिट, प्रश्‍नपत्रिका वाटप--------------------सकाळी 9.40 ते 10 
परीक्षा कालावधी ----------------------------------सकाळी 10 ते 11.30 

फिजिक्‍स, केमेस्ट्री (पेपर 2) 
परीक्षा केंद्रावर प्रवेशाची मुदत------------------------दुपारी 12.10 ते 12.30 
ओएमआर शिट, प्रश्‍नपत्रिका वाटप--------------------दुपारी12.20 ते 12.30 
परीक्षा कालावधी ----------------------------------दुपारी 12. 30 ते 2 

बायोलॉजी (पेपर 3) 
परीक्षा केंद्रावर प्रवेशाची मुदत------------------------दुपारी 2.30 ते 3 
ओएमआर शिट, प्रश्‍नपत्रिका वाटप--------------------दुपारी 2.40 ते 3 
परीक्षा कालावधी ----------------------------------दुपारी 3 ते 4.30 
 

Web Title: marathi news CET exam