खड्यांनी घेतला दोन तरुणांचा बळी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील खडकीफाटा ते दहीवद दरम्यान दत्त मंदिरासमोर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. सदर घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. महामार्गावरील खड्डे हे वाहन धारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. 

चाळीसगावकडून घरी जाणाऱ्या चिंचगव्हाण (ता.चाळीसगाव) येथील तरुणांच्या दुचाकीला मार्बल घेऊन जाणाऱ्या ट्रकने खड्डे चुकविण्याच्या नादात जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, धडकेत दोन्ही तरुण जागीच ठार झाले. ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाली असून ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथून चिंचगव्हाण (ता.चाळीसगाव) येथे घरी दुचाकी क्रमांक (एमएच. 19 एझेड, 3409) हिच्यावरुन दीपक रघुनाथ निकम (वय17) व अमोल राजेंद्र वाघ (वय 20) हे घरी जात होते. घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला धुळ्याकडून चाळीसगावकडे मार्बल घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक (एमएच, 18 एए 8147) भरधाव वेगात जात होती. चिंचगव्हाण फाटा ते खडकीसिम दरम्यान असलेल्या रस्त्यावर दत्त मंदिर समोर ट्रकने दुचाकीला समोरून धडक देत उडविले. या धडके दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon accident 2 death