लोकशाही टिकविण्यासाठी महाआघाडीला साथ द्या! : धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

चाळीसगाव : लोकसभेची ही निवडणूक आणि तुमचे एक मत केवळ एका जिल्ह्याचे, उमेदवाराचे भवितव्य ठरवणारी नाही तर या देशातली लोकशाही टिकवायची का नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही आणायची हे ठरवणारी निवडणूक आहे. देवकर यांना निवडून दिले तर तुमचे एक मत लोकशाही टिकवेल, देवकरांच्या विरोधात मत दिले, तर तुम्ही देशाला अप्रत्यक्षपणे हुकूमशाहीकडे लोटणार. त्यामुळे आपले बहुमुल्य मत देवकरांना द्या, असे आवाहन राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्याची आज सांगता होत आहे. दरम्यान, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे जळगाव मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव येथे राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मुंडे यांची सभा झाली. यावेळी व्यासपीठावर गुलाबराव देवकर, आमदार हरिभाऊ राठोड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, मनीष जैन, ज्येष्ठ नेते प्रदीप देशमुख, अनिल भाईदास पाटील, शशिकांत साळुंखे, प्रवक्ते योगेश देसले, ललित बागूल, अशोक खलाणे, प्रमोद पाटील, दिनेश पाटील, रामचंद्र जाधव, श्‍याम देशमुख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Web Title: marathi news chalisgaon dhanjay munde prachar sabha