बहाळ येथे शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

मका पिकाला पाणी भरत असताना आज सायंकाळी पाच वाजता मक्याच्या शेतात रानडुकरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

बहाळ (ता. चाळीसगाव) - आज येथे रानडुकराने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. बहाळ येथील सुकलाल यादव कुंभार हे शेतात नेहमीप्रमाणे गेले. मका पिकाला पाणी भरत असताना आज सायंकाळी पाच वाजता मक्याच्या शेतात रानडुकरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात त्यांच्या मांडीला व पाठीला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. शेतात त्यांनी आरडा ओरड केल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी धावून आले असता त्यांनी त्यांची रान डुकर कडून सुटका केली. उपचारासाठी चाळीसगाव येथे बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री पाणी भरण्यासाठी शेतात जावे लागते त्यामुळे रानडुकरांचा फार उपद्रव होतो व पिकाचेही नुकसान होत असल्याने वनविभागाने त्यांचा बंदोबस्त करावा आशी मागणी होत आहे.

Web Title: marathi news chalisgaon forest pig attack farmer

टॅग्स