महानगरी'ला चाळीसगाव स्थानकावर आजपासून थांबा : खासदार पाटील 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

चाळीसगाव : प्रवासी हिताचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जळगाव येथे राजधानी एक्‍स्प्रेस, सचखंड पाचोरा तर उद्या साडेसातला महानगरी एक्‍स्प्रेस चाळीसगाव येथे थांबवली जाणार असल्याची माहिती खासदार ए. टी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

चाळीसगाव : प्रवासी हिताचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जळगाव येथे राजधानी एक्‍स्प्रेस, सचखंड पाचोरा तर उद्या साडेसातला महानगरी एक्‍स्प्रेस चाळीसगाव येथे थांबवली जाणार असल्याची माहिती खासदार ए. टी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांचे समवेत आ. उन्मेष पाटील तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, विश्वास चव्हाण, पोपट भोळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना खासदार पाटील म्हणाले, महानगरी चाळीसगाव स्थानकावर थांबावी अशी मागणी होती तेव्हा सचखंड थांबवला तेव्हा मी आश्वासन दिलं होतं आणि दिलेली आश्वासन पूर्ण केलं उद्या चाळीसगाव येथे महानगरीचे स्वागत करू असे त्यांनी सांगितले. रेल्वे संदर्भात 5 वर्षात जळगाव परिसरात 6 रेल्वे ओहर ब्रिज झाले काही प्रस्तावित आहेत त्यात शिवाजीनगर, असोदा, दूध फेडरेशन, जळोद, तर कजगाव ब्रिजला मान्यता मिळाली. शिदवाडी अंडर ब्रिज, उधना रेल्वे दुहेरीकरण संपूर्ण निधी मिळाला काम पूर्ण झालं भुसावळ मनमाड 3 लाइन, काम सुरू आहे, येणाऱ्या काळात भुसावळ येथून नवीन गाड्या सुरू करण्यास अडचणी येणार नाहीत राजधानी जळगाव थांबा मिळाला त्याने जळगावकर सुखावले. चाळीसगाव पाचोरा स्थानकावर सरकता जिना आणि लिफ्ट लवकरच मिळणार ओव्हर ब्रिज देखील होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 211चे काम वेळेत पूर्ण झाले नाही म्हणून पुन्हा निविदा निघाली त्याने आता लागलीच कामाला सुरवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: marathi news chalisgaon mahanagari express stop