चाळीसगावच्या एकाची फसवणूक 

दीपक कच्छवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : हात उसनवारीने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन सार्वे (ता. पाचोरा) येथील तिघांसह पोहरे (ता. चाळीसगाव) येथील महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : हात उसनवारीने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन सार्वे (ता. पाचोरा) येथील तिघांसह पोहरे (ता. चाळीसगाव) येथील महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे.

पोलिसांनी सांगितले, स्वप्नील कृष्णा अहिरे (रा. चाळीसगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याने संशयित सुभाष प्रकाश भालेराव, प्रकाश अंबू भालेराव, लिलाबाई प्रकाश भालेराव (सर्व रा. सार्वे, ता. पाचोरा) यांना हात उसनवारीने 50 हजार रुपये दिले होते. हा व्यवहार पोहरे (ता. चाळीसगाव) येथील उषाबाई बाबाजी यांच्या घरी 2016 मध्ये झाला होता. ठरल्याप्रमाणे स्वप्नील अहिरे यांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. त्यानंतर घर त्यांच्या नावावर करुन देण्याचे ठरले. त्याचे खोटे दस्तावेज तयार करुन पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वप्नील अहिरे यांनी चाळीसगाव न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार, न्यायालयाने मेहुणबारे पोलिसांना वरील संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: marathi news chalisgaon news

टॅग्स