मालेगावच्या सात शिकाऱ्यांना मास व हत्यारांसह अटक

live photo
live photo

पाचोरा ः नील गायीची शिकार करून मालेगावला परतणाऱ्या सात संशयित शिकाऱ्यांना पाचोरा पोलिसांनी रविवार रात्री बंदूक व शस्त्रासह; तसेच नीलगायीच्या मांस व स्कार्पिओ गाडीसह ताब्यात घेतले. शिकारीच्या या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली, असून हे सर्व संशयित परिसराची माहिती असणारे व त्यांनी यापुर्वी देखील परिसरातील जंगलात शिकार केली असल्याचे बोलले जात आहे. 
मालेगाव येथील शिकारी पाचोरा ते जामनेर रस्त्यावरील कोकडी तांडा शिवारात शिकारीसाठी सर्व सामुग्रीसह व स्कार्पिओ गाडी घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिस उपअधिक्षक केशव पातोंड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांनी रविवारी सायंकाळपासून पाचोरा ते जामनेर रस्त्यावरील प्रमुख चौकात नाकाबंदी केली होती. सदर कारवाईसाठी तीन पोलिस अधिकारी व 25 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास (एमएच 15, बी डल्ब्यू. 5423) या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गाडी वरखेडी परिसरात पोलिसांनी अडवली. त्यावेळी चालकाने पोलिसांची नाकाबंदी तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू शामकांत सोमवंशी यांनी गाडीचा पाठलाग करत आपले गाडीच्या पुढे उभे करून व पिस्तूल रोखून गाडी थांबवली. पोलिसांच्या मदतीने गाडीतील सर्वांना खाली उतरविले त्यांना विचारपूस केली असता; त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु शस्त्रधारी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सर्वच्या सर्व पोलिसांच्या ताब्यात आले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता मागच्या डिक्कीत व शीट खाली नीलगायीच्या मासाचे तुकडे प्लॅस्टिकच्या कागदाने गुंडाळलेले आढळून आले. तसेच बारा बोअरची एक बंदूक, 16 जिवंत काडतुसे, 5 वापरलेल्या काडतुसांचे खोके, कुऱ्हाड, सर्चलाईट असे साहित्य पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्याच ठिकाणी पंचनामा करून गाडीत असलेले मांसाचे तुकडे, सर्व हत्यारे व सातही संशयितांना ताब्यात घेऊन रात्रीच वन्यजीव कलम कायदा व आर्म ऍक्‍टनुसार गुन्हा नोंदवत सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये वहिविदू मोहम्मद यासीन, मोहम्मद जफर, आरिफ अहमद, शहजाद इकबाल, रशीद अहमद, जमील अहमद, शेख शकूर (सर्व राहणार मालेगाव) यांना अटक केली. तसेच संशयितांकडून टाटा सुमो गाडीसह 4 लाख 46 हजार 710 रुपयांचा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com