उसतोड कामगारांची मुले शाळेबाहेर

सुधाकर पाटील
शनिवार, 17 मार्च 2018

भडगाव - पोटाची खळगी भरण्यासाठी उसतोड कामगार इतर ठीकाणी जातात. यासाठी संपुर्ण कुटुंबच काही दिवसासाठी स्थलांतरीत होत असते. त्यामुळे अक्षरांची ओळख ज्या प्राथमिक शाळेत करून दिली जाते त्या शाळांमधील विद्यार्थाच्या वाट्याला ही स्थंलातराची वेळ येते असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील तब्बल 5 हजार 682 विद्यार्थ्यांचे यंदा स्थलांतर झाल्याचे चित्र आहे. 

भडगाव - पोटाची खळगी भरण्यासाठी उसतोड कामगार इतर ठीकाणी जातात. यासाठी संपुर्ण कुटुंबच काही दिवसासाठी स्थलांतरीत होत असते. त्यामुळे अक्षरांची ओळख ज्या प्राथमिक शाळेत करून दिली जाते त्या शाळांमधील विद्यार्थाच्या वाट्याला ही स्थंलातराची वेळ येते असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील तब्बल 5 हजार 682 विद्यार्थ्यांचे यंदा स्थलांतर झाल्याचे चित्र आहे. 

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला खानदेशातील विशेषतः जळगाव जिल्ह्यातील मजुर हे उसतोडीसाठी इतर जिल्ह्यात तर काही परराज्यात ही जात असतात. मार्च महीन्यापर्यंत ते गावापासुन लांब राहतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या चिमुकल्याची फरपट होत असते.  त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

साडेपाच हजार विद्यार्थी स्थलांतर 
जिल्ह्यातून यावर्षी तब्बल 5 हजार 682 विद्यार्थी हे पालकांसोबत गेल्याचे शिक्षण विभागाकडुन सांगण्यात आले आहे. चाळिगावातून 3 हजार 820 विद्यार्थी स्थलांतरीत झाले आहे. त्यामुळे काही शाळा चार महिन्यापासुन ओस पडल्या असल्याचे चित्र आहे. विशेषतः बंजारा समाज हा उसतोडीसाठी अधिक प्रमाणात स्थलांतरीत होत असतो. 

...तर शैक्षणिक नुकसान ? 
शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहीजे. मात्र उसतोड कामगारांचे मुले ही चार-पाच महीने शाळेपासुन लांब राहत असल्याचे चित्र आहे. सर्व कुटुंबच उसतोडीसाठी स्थलांतरीत होते. कारण पाल्याला कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थितीत होतो. त्यामुळे पालक पाल्यांना ही सोबत घेऊन जातात. पर्यायाने त्यामुळे या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असते. ते शाळेपासून लांब जात असल्याने शिक्षणाच्या प्रवाहापासुन लांब राहत असतात ही वास्तवता आहे.

विद्यार्थ्याना शिक्षण हमी कार्ड
जे विद्यार्थी हंगामी स्वरूपात स्थलांतर होत असतात त्या विद्यार्थ्याना शाळांकडुन 'शिक्षण हमी कार्ड' दिले जाते.  ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील त्या ठिकाणच्या जवळच्या शाळांना ते कार्ड दाखवून त्या विद्यार्थ्याना हंगामी स्वरूपाचा प्रवेश दिला जातो असे शिक्षण विभागाकडुन सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कीती विद्यार्थ्यानी असे किती विद्यार्थी करतात याबाबत साशंकता आहे. अशा विद्यार्थ्यासाठी शासनाने हंगामी वस्तगृहाची सुविधाही केलेली असते. मात्र, जिल्ह्यात फक्त चाळीसगाव व भडगाव तालुक्यातच प्रत्येकी एक हंगामी वस्तगृह सुरू आहे. चाळीसगाव तालुक्यात जुनपाणी घाट, भडगावात वडगाव-नालबंदी येथे वस्तीगृह आहेत. त्या वस्तगृहात विद्यार्थी हे निवासी असतात. त्यांच्या राहण्यापासुन भोजनाची व्यवस्था तेथे असते. त्यासाठी शासनाकडुन अनुदान दिले जाते. उर्वरित ठिकाणचे हंगामी वस्तगृहाचे व्यवस्थापन समित्यांकडुन प्रस्तावच आले नसल्याचे शिक्षण विभागाकडुन सांगण्यात आले. मात्र अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने स्वतः सोय करणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यातील तालुक्यात  सार्वाधिक स्थलांतरीत झालेले विद्यार्थी संख्या

तालुका विद्यार्थी संख्या
चाळीसगाव 3820
भडगाव 507
एरोडंल 291
पारोळा 354

''उसतोड कामगारांच्या मुलांसाठी ज्या ठीकाणाचे हंगामी वस्तगृहाचे प्रस्ताव आले आहेत, तेथे वस्तीगृह सुरू करण्यात आले आहेत. तर जे विद्यार्थी पालकांसोबत गेले आहेत त्यांना शिक्षण हमी कार्ड देण्यात आले आहेत''.
- बी.जी.पाटील शिक्षणधिकारी (प्राथमिक) जळगाव

Web Title: marathi news chalisgaon Sugarcane workers students