पन्नास हजारांसाठी केला पत्नीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

चाळीसगाव ः घोडेगाव (ता. चाळीसगाव) शिवारात शनिवारी (16 जून) गट क्रमांक 182 मध्ये अनिता राठोड या महिलेचा मृतदेह शेतातील नाल्यात आढळुन आला होता. याप्रकरणी पोलीसांनी अधिक तपास केला असता, 50 हजारांसाठी पती सुभाष राठोड याने आपल्या पत्नीचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

चाळीसगाव ः घोडेगाव (ता. चाळीसगाव) शिवारात शनिवारी (16 जून) गट क्रमांक 182 मध्ये अनिता राठोड या महिलेचा मृतदेह शेतातील नाल्यात आढळुन आला होता. याप्रकरणी पोलीसांनी अधिक तपास केला असता, 50 हजारांसाठी पती सुभाष राठोड याने आपल्या पत्नीचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे. 
ढेकु (ता. नांदगाव) येथील माहेर असलेली अनिता राठोड हिचे दहा वर्षांपुर्वी घोडेगाव येथील सुभाष राठोड याच्याशी लग्न झाले होते. राठोड दांम्प्त्य हे मुंबई येथे गवंडी कामासाठी जात होते. तर काही दिवस गावी येऊन शेती करून आपला उदरनिर्वाह चालवित होते. आठवड्यापूर्वीच ते गावी घोडेगाव येथे आले होते. मुंबई येथुन काम करून त्यांनी 55 हजार रूपये जमविले होते. त्यापैकी 5 हजाराचे सुभाष राठोड याने शेतीसाठी बियाणे आणले तर उर्वरीत 50 हजार रूपये हे पत्नी अनिता हिच्याकडे होते. पत्नी अनिताकडे असलेले 50 हजारांची मागणी सुभाष राठोड हा करीत होता. परंतु 50 हजार कुठे ठेवले आहेत हे अनिता राठोड ही सांगत नव्हती. पत्नी अनिता हिने 50 हजार रूपये हे तिच्या आईवडीलांना दिले असल्याचा संशय सुभाष राठोड याला आला. 50 हजार देण्याघेण्याच्या वादातुन मयत अनिता राठोड व सुभाष राठोड यांच्यात गुरूवारी (15 जून) रात्री जोरदार भांडण झाले. यावेळी सुभाष राठोड याने रागाच्या भरात अनिता राठोड हिच्या डोक्‍यात लाकडी दांडा मारला असता तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात सुभाष राठोड याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 

.मृतदेह शेतातच पडून 
.मयत अनिता व सुभाष राठोड यांच्या भांडणात डोक्‍यात गंभीररित्या लाकुड लागल्याने अनिता हिचा जागीच मृत्यू झाला. अनिता व सुभाष यांच्यात कायम वाद होत होते. वाद झाल्यानंतर अनिता ही शेतातच झोपून राहत असल्याने पती सुभाष राठोड यांने भांडणांनंतर तिचा तपास केला नाही. अनिता ही शेतातच झोपली असल्याचे समजून सुभाष हा घरी आला. परंतु दुसऱ्या दिवशी अनिता राठोड ही घरी न आल्याने या घटनेचा उलगडा झाल्याची माहिती तपासी अधिकारी प्रदीप वाल्हे यांनी दिली.

Web Title: marathi news chalisgaon wife murder