मी सांगेन मगच अर्ज भरा,दादांची महापौरसाठी इच्छुकांना सूचना

residentional photo
residentional photo


नाशिक ः शहराच्या 16 व्या महापौरपदासाठी सर्वसाधारण गटासाठी आरक्षण खुले झाल्यानंतर बहुमत असलेल्या भाजपमध्ये इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू झाल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मुंबईत भेटीस गेलेल्या इच्छुकांना अखेर "मी सांगेल त्याच वेळी महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करा', अशा सूचना दिल्याने सर्वांच्या तलवारी आदेश येईपर्यंत म्यान झाल्या आहेत. 

     महापौरपदासाठी 15 सप्टेंबरला मुदत संपुष्टात आली असली, तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तीन महिने मुदतवाढ दिल्याने 15 डिसेंबरपर्यंत सर्वच निवांत होते. परंतु नगरविकास विभागाकडून काढलेले मुदतवाढीचे आदेश 22 ऑगस्टपासून लागू असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर अवघे सात दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुकांची धावपळ उडाली. त्यापूर्वी 13 नोव्हेंबरला महापौरपदाचे आरक्षण काढण्यात आले. त्यात सर्वसाधारण गटासाठी महापौरपद खुले झाल्याने इच्छुकांची गर्दी अधिक वाढली. विभागीय आयुक्तांकडे गुरुवारी प्रस्ताव सादर झाल्यानंतर जोरदार लॉबिंग सुरू झाले.

      शुक्रवारी (ता. 15) सकाळी इच्छुकांनी थेट मुंबई गाठत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गिरीश महाजन, संघटनमंत्री किशोर काळकर यांची भेट घेऊन महापौरपदावर दावेदारी केली. इच्छुकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी, "मी सांगेल त्याच वेळी उमेदवारी अर्ज दाखल करा', अशा स्पष्ट सूचना देताना आगामी महापौरपदाचा उमेदवार कोण?, याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला. 

विभागनिहाय लॉबिंग 
    महापौरपदावर दावेदारी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी इच्छुकांनी भाजपच्या मुंबई येथील वसंतस्मृती कार्यालय गाठले. माजी सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, हिमगौरी आहेर-आडके, ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी, दिनकर आढाव, अरुण पवार, मुकेश शहाणे, संगीता गायकवाड यांच्यासाठी हेमंत गायकवाड, शशिकांत जाधव, अलका आहेर, संभाजी मोरुस्कर यांनी महापौरपदावर दावेदारी केल्याचे समजते. पंचवटी विभागाला पहिले महापौरपद मिळाल्याने आता सातपूर, नाशिक रोड विभागासाठी नगरसेवकांचे लॉबिंग सुरू झाले आहे. विभागनिहाय एकत्रित नगरसेवकांकडून भेट घेऊन महापौरपदावर दावा केला जात आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com