दिल्लीसह चेन्नई अन्‌ मुंबईमध्ये  कांदा भावात एक हजाराची वृद्धी 

live
live

नाशिक ः अफगाणिस्तानमधील आयात कांद्यामुळे भावात घसरण झाल्याचे चित्र तयार झालेले असताना आज दिल्लीसह चेन्नई आणि मुंबईत भावात क्विंटलमागे एक हजारांनी वृद्धी झाली. मुंबई आणि चेन्नईमध्ये एकशे दहा रुपये, तर दिल्लीत 75 रुपये किलो भावाने कांद्याची विक्री झाली. सातारामध्ये सर्वाधिक दीडशे रुपये किलो असा भाव शेतकऱ्यांना मिळाला आहे. 

नवीन कांद्याची आवक सुरु झालेली असताना अल्वर आणि बेंगळुरुमध्ये भाव स्थीरावलेत. क्विंटलला अल्वरमध्ये साडेसात हजार, तर बेंगळुरुमध्ये साडेनऊ हजार रुपये असा भाव राहिला. महुआमध्ये 8 हजार 260, भुवनेश्‍वरमध्ये 8 हजार, पाटणामध्ये 8 हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. कोल्हापूरमध्ये घसरणीला लागलेल्या कांद्याच्या भावाला "ब्रेक' लागत आज एक हजार रुपये अधिक म्हणजेच,

भावात चढउतार

आठ हजार क्विंटल असा भाव मिळाला. मात्र क्विंटलमागे पुणे आणि पिंपळगावमध्ये पाचशे रुपयांची घसरण होत शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपये मिळालेत. नागपूरमध्ये साडेसहा हजार रुपये असा भाव राहिला. चांदवडमध्ये काल (ता. 11) 7 हजार 770 रुपये क्विंटल भाव मिळाला होता. आज इथे 7 हजार 600 रुपये असा भाव निघाला.

सोमवारनंतर परिणाम

आठवड्याच्या सुरवातीला सोमवारी पूर्वीच्या सुट्यांमुळे कांद्याची आवक बाजारात वाढली होती. त्यामुळे भावात घसरण झाली होती. कांद्याचे आगार असलेल्या लासलगावमध्ये आवक दुप्पट झाली होती. सोमवारनंतर मात्र दिवसाला 10 हजार क्विंटल आवक होणाऱ्या कांद्याची आवक दिवसाला 5 हजार क्विंटलच्या आसपास राहिली. नवीन कांद्याची आवक सुरु झाल्याने यापुढील काळात दिवसाला लासलगावमध्ये सहा ते सात हजार क्विंटल कांद्याची आवक होईल, असा अंदाज बाजार समितीतर्फे वर्तवण्यात आला. 

आगारातील कांद्याचे भाव 
(आकडे क्विंटलला रुपयांमध्ये) 
बाजारपेठ आजचा भाव बुधवारचा (ता. 11) भाव 
मनमाड 6 हजार 195 6 हजार 
येवला 7 हजार 601 6 हजार 551 
देवळा 7 हजार 840 7 हजार 
लासलगाव 8 हजार 7 हजार 252 
मुंगसे 8 हजार 7 हजार 400 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com