बांधकाम व्यावसायिक राजेगावकर यांची 26 कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नाशिक : नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक व सुयोजित इन्फ्रास्ट्रक्‍चर्सचे संचालक अनंत राजेगावकर यांची प्लॉट खरेदीप्रकरणातून तब्बल 26 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात मुख्य संशयित मृत झाल्याने त्याच्या कुटूंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
   

नाशिक : नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक व सुयोजित इन्फ्रास्ट्रक्‍चर्सचे संचालक अनंत राजेगावकर यांची प्लॉट खरेदीप्रकरणातून तब्बल 26 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात मुख्य संशयित मृत झाल्याने त्याच्या कुटूंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
   

अनंत केशव राजेगावकर (रा. मॉडेल कॉलनी, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अभिषेक बद्रिप्रसाद जयस्वाल, अखिलेश बद्रिप्रसाद जयस्वाल, श्रीमती संतोष बद्रिप्रसाद जयस्वाल यांच्यासह बजाज फायनान्सचे अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या तक्रारीनुसार, श्री. राजेगावकर यांचा सातपूरमध्ये मंजूर लेआऊट क्र. 17 ते 19 चे 1200 चौरस मीटर आणि 4000 चौ.मी. क्षेत्राचा प्लॉट होत. मुख्य संशयित बद्रिप्रसाद जयस्वाल याने 13 मे 2015 रोजी सदरचा प्लॉट 25 कोटी 98 लाख 75 हजार रुपयांचा खरेदी केला आणि तोच प्लॉट त्याच दिवशी श्री. राजेगावकर यांना विकसित करण्यासाठी दिला. त्यासाठीचा डेव्हल्पमेंट करारही केला. 

 खरेदी खत करून देताना, 11 कोटी रुपये धनादेशाने देणार असल्याचे खरेदी खतामध्ये लेखी लिहून दिले. संशयित जयस्वाल याने सदरील कागदपत्रे बजाज फायनान्स कंपनीकडे सादर करून त्या मालमत्तेवर 11 कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव दिला. कंपनीने अवघ्या तीन-चार दिवसात 11 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून दिले. तसेच कंपनीला दिलेल्या लेखी अर्जात श्री. राजेगावकर यांना 11 कोटी रुपये धनादेशाने दिल्याचे लिहून दिले. सदरचे कर्ज मंजूर करताना कंपनीला देण्यात आलेला सर्चरिपोर्टही चुकीचा असल्याचे निदर्शनास आले आहे. 

मुख्य संशयित बद्रिप्रसाद जयस्वाल हा बॉटल सम्राट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मुख्य संचालक आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाल्याने सध्या या कंपनीची धुरा मुलगा अभिषेक, अखिलेश व पत्नी संतोष जयस्वाल हे सांभाळत असल्याने त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: marathi news cheating for builder