प्रज्ञानंधा, आर्यनची 18 वर्षाखालील गटात आघाडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

नाशिक-भारताचा आर. प्रग्नानंधाने याने जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ड्रॉ ची नोंद केली तर, दिव्या देशमुखने विजय मिळवत छाप पाडली. ग्रँडमास्टर प्रज्ञानंधाने इराणचा आर्यन घोलामीला रोखत 18 वर्षाखालील गटात सहाव्या फेरीनंतर पाच गुणांसह आघाडी घेतली.
      चुरशीच्या लढतीत आंतरराष्ट्रीय मास्टर असलेल्या आर्यनने चमक दाखवली पण, ग्रँडमास्टर प्रज्ञानंधाने 39 व्या चालीत आपली क्षमता सिद्ध केली. दुस-या ग्रँडमास्टर पी इनियानने जर्मनीच्या वॅलेंटाईन बकेल्सला अडचणीत आणले अखेर 50 चालीनंतर दोघांनीही सामना बरोबरीत सोडण्याचा निर्णय घेतला.

     महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्याने मुलींच्या 14 वर्षाखालील गटात कझाकस्तानच्या लिया कुर्मानग्लियेवाविरुद्ध चमक दाखवली व त्यामुळे तिचे एकूण 4.5 गुण झाले.ती भारताच्या रक्षिता रवी, हॉलंडच्या एलिन रोएबर्स व महिला फिडे मास्टर रशियाच्या एकातरीना नास्यरोवाशी अर्ध्या गुणाने मागे आहे.
    अर्मेनियाचा ग्रँडमास्टर शांत सर्गस्यान (18 वर्षाखालील खुला गट), रशियाची पोलिना शुवालोवा (18 वर्षाखालील मुली गट), आंतरराष्ट्रीय मास्टर मोक हंस निएमन ( 16 वर्षाखालील खुला गट),महिला कँडीडेट मास्टर लेया गॅरीफुलिना (16 वर्षाखालील मुली गट), फिडे मास्टर श्रीश्‍वान मरालाक्षिकरी (14 वर्षाखालील खुला गट व दिव्या यांनी आपापल्या लढतीत पुर्ण गुणांची कमाई केली.
     शांतने 18वर्षाखालील गटात कझाकस्तानचा फिडे मास्टर रमाझान झालमाखानोवला पराभूत केले तो इनियानसोबत 4.5 गुणांवर आहे. 16 वर्षाखालील गटात भारताच्या कँडिडेट मास्टर आरोन्यक घोषने रशियाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर स्टेफान पोगोस्यानविरुद्ध ड्रॉ ची नोंद केली. रशियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर रुदीक मकारिअनने इराणचा फिडेमास्टर आराश दाघलीला पराभूत करत 5.5 गुणांसह आघाडी घेतली.

 महत्वाचे निकाल :
18 वर्षाखालील खुला गट :  आर्यन घोलामी ( आयर्लंड, 5) ड्रॉ विरुद्ध आर. प्रज्ञानंधा (भारत, 5 गुण), वॅलेंटाईन बकेल्स ( जर्मनी 4.5) ड्रॉ वि. पी. इनियान (भारत 4.5 गुण), विक्टर गाझिक (4.5) वि.वि. आदित्य मित्तल (भारत 4 गुण), रमाझान झालामाखानोव (कझाकस्तान 3.5) पराभूत वि. शांत सर्गस्यान ( अर्मेनिया 4.5)

 मुली 18 वर्षाखालील : विक्टोरिया राडेवा (बल्गेरिया 4) पराभूत वि. पोलिना शुवालोवा (रशिया 5)

16 वर्षाखालील खुली : रुदीक मकारिअन (रशिया 5.5) वि.वि. आराश दाघील ( आयर्लंड 4.5), स्टेफान पोगोस्यान (रशिया 4.5) ड्रॉ. वि. आरोन्यक घोष ( भारत 5), टर्गेट आयदीन ( अमेरिका 4) पराभूत वि. मोक हँस निएमन ( अमेरिका 5)

16 वर्षाखालील मुली : मेहेंदी सिल (भारत 4.5 ) ड्रॉ वि. सलोनिका सैना (भारत 4.5)
 
14 वर्षाखालील खुले : जिआजुन सुन (चीन 4) पराभूत वि. एस मरलाक्षिकरी (भारत 5), एल आर स्रीहरी (भारत 5) वि.वि. अ‍ॅलेक्स कोलाय ( अमेरिका 4)
 
14 वर्षाखालील मुली : रक्षिता रवी (भारत 5) ड्रॉ वि. एलिन रोएबर्स (नेदरलँड्स 5), अ‍ॅना ल्होट्स्का (चेक प्रजासत्तक 4) पराभूत वि. एकातरिना नास्यरोवा (रशिया 5)  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chess championship