आरोन्यककडून निएमन पराभूत, 16 वर्षाखालील खुल्या गटात आघाडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नाशिक-भारताचा कँडिडेट मास्टर आरोन्यक घोषने अमेरिकेचा अव्वल मानांकित हांस निएमनला पराभूत करत जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 16 वर्षाखालील खुल्या गटात संयुक्त आघाडी घेतली. आठव्या मानांकित आरोन्यकने नवव्या फेरीतील लढतीत 42 चालीत प्रतिस्पर्धी खेळाडूस नमविले. तो आता सात गुणांसह हांस सोबत आघाडीवर आहे.रशियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर रुदीक मकारिआन व कँडीडेट मास्टर कुशाग्र मोहन यांचा सामना ड्रॉ झाल्याने ते संयुक्तपणे दुस-या स्थानी आहेत.
     
 18 वर्षाखालील खुल्या गटात भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने बेलारुसचा आंतरराष्ट्रीय मास्टर विआचास्लाऊ झारुबित्स्कीला पराभूत करत 7.5 गुणांसह आघाडी मिळवली. अव्वल मानांकित ग्रँडमास्टर अर्मेनियाचा शांत सर्गस्यानने विजयासह 7 गुण मिळवत आपले आव्हान कायम ठेवले आहे.14 वर्षाखालील खुल्या गटात आर. अबिनंधन व अव्वल मानांकित एस मरालक्षिकरी यांना सामन्यात पराभूत व्हावे लागले. आता केवळ दोन फे-या शिल्लक आहेत. अबिनंधनला अजरबैजानचा आंतरराष्ट्रीय मास्टर आयदीन सुलेयमनली याने नमविले. आयदीनकडे हा एकमात्र खेळाडू आघाडीवर आहे.
       
14 वर्षाखालील मुलींच्या गटात दुस-या मानांकित महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रक्षिता रवीला अजरबैजानच्या महिला फिडे मास्टर अयान अलाहवेरदीयेवाकडून पराभूत व्हावे लागले. रुय-लोपेझने सुरुवात करत अयानने रक्षिताविरुद्ध आघाडी मिळवली व नंतर तिला पराभूत केले. रक्षिताच्या पराभवामुळे डच खेळाडू एलिन रोएबर्सला फायदा झाला. तिने रशियाची महिला फिडे मास्टर एकातेरिना नास्यरोवाला नमविले.
       
रशियाची महिला कँडिडेट मास्टर लेया गारीफुलिना (7.5)हिने 16 वर्षाखालील मुलींच्या गटात अव्वल स्थान कायम ठेवले आहे. लेयाने भारताची महिला फिडे मास्टर सलोनिका सायनाविरुद्ध 47 चालीनंतर ड्रॉ ची नोंद केली. कझाकस्तानच्या नाझेरके नुरगलीने भारताच्या अक्षयासोबत बरोबरी राखली.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chess championship