चिंचवे शिवारात सापडले स्त्री जातीचे अर्भक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

अंबासन, (नाशिक) : मालेगाव तालुक्यात मााणुसकीला लाज वाटावी अशी एक घटना समोर आली आहे. हवीशी वाटणारी नकोशी गाळणे चिंचवे शिवारातील वारख्या डोंगराच्या पायथ्याशी काटेरी झुडपात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे अर्भक अनैतिक संबंधामुळे फेकण्यात आले की नकोशी झाली म्हणून आईने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. याबाबत चर्चेला उधान आले आहे. अर्भकास वडणेर येथील वैद्यकिय अधिकारी डाॅ. दिपक निकम यांनी प्रथमोपचार करून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात रवाना केले आहे. वडणेर येथील पोलिस ठाण्यात अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news child