अहो ऐकलंय का...2 डिसेंबरपासून मिशन इंद्रधनुष्य...बालकांना द्या डोस

residentional photo
residentional photo

नाशिक ः केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला लसीकरणाने संरक्षित करण्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम आखण्यात आली आहे.  नाशिक जिल्ह्यात 2 डिसेंबरपासून राबविण्यात येणार आहे.

मातापर्यत पोहचविण्यासाठी मोहिम

बालकांमधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी ही लसीकरण मोहीम प्रभावी माध्यम असून, या मोहिमेची जनजागृती वंचित बालक व मातांपर्यंत पोचविण्यासाठी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या. 

टास्क फोर्सची निर्मिती
मोहिमेच्या जिल्हा टास्क फोर्स समितीची बुधवारी (ता.27) जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्‍वरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. प्रकाश नांदपूरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर आदी उपस्थित होते. 

पंधरा हजार बालकांना लाभ 

विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण 2.0 मोहिमेत देशातील 271 जिल्ह्यांमध्ये राज्यातील 25 जिल्हे व 20 महापालिका यांचा समावेश आहे. या मोहिमेची सुरवात 2 डिसेंबर 2019 पासून होणार असून, पूर्ण डिसेंबरमध्ये 863 ठिकाणी लसीकरण सत्र होणार आहे. जिल्ह्यात महापालिका धरून साधारण 15 हजार 53 बालकांना व दोन हजार 530 गर्भवतींना या मोहिमेचा लाभ होणार आहे. ही मोहीम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून सार्वजनिक सुट्या वगळून पुढे सात दिवस सुरू राहील, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. नांदपूरकर यांनी लसीकरण मोहिमेची सविस्तर माहिती दिली. 


मोहिमेत घटसर्प, गोवर, धर्नुवात यांच्या मागील दोन वर्षांत झालेला उद्रेक, नियमित लसीकरणाचे काम कमी असणारा भाग, स्थलांतरित वस्त्या व अतीदुर्गम डोंगराळ भाग, गाव, सलग तीन सत्र लसीकरण रद्द झालेल्या भागांचा मिशन इंद्रधनुष्य मोहिमेत समावेश आहे. या भागांमध्ये लसीकरणापासून एकही बालक व माता वंचित राहणार नाही. 
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com