सहावर्षीय चिमुरड्याला लाभली नवी दृष्टी,युवा फाऊंडेशनचा पुढाकार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नांदगाव :वडीलांबरोबर रानात शेळया चारण्यासाठी गेलेल्या एका सहावर्षीय चिमुरड्याला खेळतांना काडीचा फटका बसला.पण जखमेकडे गांभीर्याने न पाहणारे कुटूंब नंतर हादरून गेले. उदरनिर्वह शेळ्या चारण्याचा व्यवसायावर, त्यातच  उपचारासाठी जवळ पैसे नाही, चिमुरड्यांचा डोळा निकामी होण्याची वेळ आली, अशा परिस्थितीत  चांदोरा (ता.नांदगाव)च्या युवा फाऊंडेशनने पुढाकार घेत या कुटूबाला मदतीचा हात दिला आणि त्यातून चिमुरड्याला पुन्हा नवी दृष्टी मिळाली.. 

   चांदोरा (ता. नांदगाव) येथील गरीब कुटुंबातील मुलाला नांदगावच्या युवा फाउंडेशनमुळे नवी दृष्टी मिळाली.डॉक्टरच्या उपचाराचा खर्च ऐकूण 
महेशचे कुटुंब हादरून गेले. डोळ्यावर उपचार करणे गरजेचे होते. मात्र, दवाखान्याच्या खर्चाचा प्रश्‍न होता. तो त्यांना परवडणारा नव्हता.  महेशच्या या अवस्थेबाबत राजेंद्र घोटेकर, सरपंच लीलाताई घोटेकर यांनी विशाल काकळीज यांना सांगितले. विशाल यांनी युवा फाउंडेशनचे सुमित सोनवणे व प्रा. घनश्‍याम कोळी याच्यांशी संपर्क साधला. युवा फाउंडेशनच्या युवकांनी याबाबत पुढाकार घेतला.

मालेगावच्या श्रेष्ठ नेत्रालयाचे डॉ. तुषार सामुद्रे यांच्या सहकार्याने धुळे येथील वाणी चॅरिटेबल हॉस्पिटलच्या शारदा नेत्रालयाचे नेत्रचिकित्सक डॉ. गुंजन पाटील यांनी महेशच्या इजा झालेल्या नेत्रपटलावर यशस्वी शस्त्रक्रिया केली व तीही मोफत. यामुळे महेशला नवी दृष्टी मिळाली. महेशला नवी दृष्टी मिळाल्याचा आंनद युवा फाउंडेशनने आगळ्या पद्धतीने साजरा केला. फाउंडेशनेचे अध्यक्ष विकास शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच लीलाबाई घोटेकर, राजेंद्र घोटेकर, विशाल काकळीज, सुमित सोनवणे, विकास शर्मा, सुमित गायकवाड, ऋषी जाधव, उबेद शेख, आनंद घोडके, प्रसाद वडनेरे, नीलेश्‍वर पाटील, महेश पेयवाल, प्रसाद वडनेरे आदींच्या उपस्थितीत महेशला दप्तर, वही, पेन, पाटी, वॉटरबॅग देण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news child new eye