चोला मंडलम फायनान्सची 62 लाखांची फसवणूक,१८जणांविरोधात गुन्हे

residentional photo
residentional photo

नाशिक : मायको सर्कल परिसरात असलेल्या चोला मंडलम्‌ इन्व्हेस्टमेंट ऍण्ड फायनान्स कंपनीकडून वाहन कर्ज घेऊन ते न फेडता तब्बल 62 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. संशयितांनी कर्जाने घेतलेल्या वाहनांचीही परस्पर विल्हेवाट लावत कंपनीची फसवणूक केली. त्यामुळे याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात 18 संशयितांविरोधात विश्‍वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
     

मायको सर्कल परिसरात चोला मंडलम्‌ इन्व्हेस्टमेंट ऍण्ड फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीकडे संशयित शैला शिरोळे (49), भाविक शिरोळे (27,रा.साईश्रद्धा संकुल, हनुमान चौक, चेहेडी) यांनी वाहनकर्ज मंजूर करून टाटाचे एलपीटी वाहन (एमएच15सीके9656) खरेदी केली. पण त्यापोटीचे 8 लाख 96 हजार 614 रुपयांचे कर्ज न फेडता वाहनाचे परस्पर विल्हेवाट लावली आहे. त्याचप्रमाणे, संशयित विजय चव्हाण (54), केशव चव्हाण (40, रा.हिसवळ, ता.मालेगाव) यांनी क्रुझर क्‍लासिक (एमएच04व्ही0899) वाहनाचे 5 लाख 45 हजार 865 रुपयांचे वाहन कर्ज फेडले नाही. संशयित विठ्ठल साळवे (47), नंदा साळवे (46, रा.स्वारबाबानगर,सातपूर) यांनी आयशर टेम्पोचे (एमएच04एफ8253) 2 लाख 76 हजार 754 रुपयांचे कर्ज फेडले नाही. संशयित प्रदीप ब्रह्मेचा (33), गुलाबचंद ब्रह्मेचा (63, रा.सारसंगम सोसायटी,पंपींग स्टेशन,नाशिक) यांनी वाहनाचे (एमएच15एजे9953) 4 लाख 21 हजार 400 रुपयांचे कर्ज फेडले नाही. संशयित सोनम नवले (28), शांताराम नवले (33, रा.चिंचोली, ता.सिन्नर) यांनी टाटा ट्रकचे (एमएच15डीके6339) खरेदी केला. 13 लाख 11 हजार 721 रुपयांचे कर्ज फेडले नाही. संशयित शिवाजी कहार (46), मंगल शिवाजी कहार (रा.कहारमळा,अंदरसूल ता.येवला) यांची क्रुझर क्‍लासिक वाहनाचे (एमएच15सीएम3983) 8 लाख 39 हजार 735 रुपयांचे कर्ज फेडले नाही. संशयित अरुण सानप (55), परिक्षित सानप (28, रा.सायखेडा,ता.निफाड) यांनी वाहनाचे (एमएच04एच9498) 2 लाख 1 हजार 290 रुपयांचे कर्ज फेडले नाही. संशयित नानासाहेब पवार (52), शोभा पवार (45, रा.दत्तचौक,सिडको) यांनी वाहनाचे (एमएच15डीके1515) 12 लाख 74 हजार 546 रुपयांचे कर्ज फेडले नाही. संशयित अब्दुल शेख (40), अब्दुल हमीद शेख (23, रा.घोटी, ता.इगतपुरी) यांनी बोलेरो पीकअप वाहनाचे (एमएच04सीयु6291) 4 लाख 30 हजार 90 रुपयांचे कर्ज फेडले नाही. उलट या संशयितांनी वाहनावर कर्ज असतांना त्यांची परस्पर विल्हेवाट लावत 62 लाख रुपयांची कंपनीची फसवणूक केली. त्यामुळे प्रल्हाद पाटील यांच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिसात 18 संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com