नाशिक सभापती चुंभळेंच्या  विरोधात अविश्‍वास दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नाशिक : नाशिक पंचायत समितीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सभापती रत्नाकर चुंभळे यांच्याविरुद्ध आज जिल्हाधिकारी राधाकृष्णन्‌ बी. यांच्याकडे अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता असताना याच पक्षाच्या सर्व सदस्यांनी बंडाचे निशाण उपसल्याने जिल्हाभरात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

नाशिक : नाशिक पंचायत समितीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सभापती रत्नाकर चुंभळे यांच्याविरुद्ध आज जिल्हाधिकारी राधाकृष्णन्‌ बी. यांच्याकडे अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता असताना याच पक्षाच्या सर्व सदस्यांनी बंडाचे निशाण उपसल्याने जिल्हाभरात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

पंचायत समितीचे आठ सदस्य असून त्यात एका अपक्ष पुरस्कृत सदस्यांसह राष्ट्रवादीचे सहा सदस्य आहेत. उरलेले दोन शिवसेनेचे सदस्य आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा विजयश्री चुंभळे, हिरामण खोसकर, विष्णूपंत म्हैसधुणे, दिलीप थेटे यांच्यामुळे राष्ट्रवादीला पंचायत समितीची एकहाती सत्ता मिळण्यास मदत झाली आहे.

   माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे नाशिकच्या दौऱ्यावर आले असताना श्री. चुंभळे यांच्या कारभाराविषयी काही जणांनी नाराजीचा सूर आळवला होता. त्यावेळी श्री. भुजबळ यांनी बोलावून सबुरीचा सल्ला दिला होता. त्यानंतरही राष्ट्रवादीच्या सदस्यांनी श्री. चुंभळे यांच्याविरुद्ध नाराजी कायम ठेवत थेट अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार यावर अविश्‍वास प्रस्तावाचे भवितव्य अवलंबून असेल असे मानले जात आहे. 

उपसभापतींचीही नाराजी 
जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्‍वास प्रस्ताव दाखल करणाऱ्यांमध्ये उपसभापती कविता बेंडकोळी यांचाही समावेश आहे. ढवळू फसाळे, डॉ. मंगेश सोनवणे, विजय जगताप, विजया कांडेकर, छाया डंबाळे, उज्वला जाधव यांच्या स्वाक्षरी अविश्‍वास प्रस्तावावर आहेत. दरम्यान, चुंभळे कुटुंबातील वादंगामुळे रत्नाकर चुंभळे यांना स्थानिक राजकीय सत्तास्थानावरुन यापूर्वी पायउतार व्हावे लागले आहे. आताही कौटुंबिक कलह अविश्‍वास प्रस्तावाला कारणीभूत ठरला नाही ना? याबद्दल तालुकाभर उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. 
... 

मनमानी कारभाराची तक्रार 
श्री. चुंभळे यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव दाखल करताना मनमानी कारभाराची तक्रार सर्वांची आहे. पंचायत समितीच्या सभा वेळेवर होत नाहीत असेही गाऱ्हाणे प्रस्तावात मांडण्यात आले आहे. 
 

Web Title: marathi news chumble panchyat samiti motion

टॅग्स