सिडकोतील अतिक्रमणे काढणार,शुल्कही वसुलीः आयुक्त मुंढे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

सिडको,ता.19:सिडकोच्या सहाही गृहनिर्माण योजना महापालिकेकडे हस्ताअन्तरित झालेल्या आहेत त्यामुळे लवकरच नागरिकानी स्वताहून अतिक्रमने काढून घ्यावीत अन्यथा महापालिका अतिक्रमने काढणार असून त्याचा खर्च संबधित नागरीकाकडून वसूल करेल असा इशारा आज महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी वॉक विथ कमिशनर या उपक्रमात दिला.

सिडको,ता.19:सिडकोच्या सहाही गृहनिर्माण योजना महापालिकेकडे हस्ताअन्तरित झालेल्या आहेत त्यामुळे लवकरच नागरिकानी स्वताहून अतिक्रमने काढून घ्यावीत अन्यथा महापालिका अतिक्रमने काढणार असून त्याचा खर्च संबधित नागरीकाकडून वसूल करेल असा इशारा आज महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी वॉक विथ कमिशनर या उपक्रमात दिला.

  राजे संभाजी स्टेडियमवर झालेल्या या उपक्रमात विभागात सुमारे 134 तक्रारी मांडण्यात आल्या. यावेळी आयुक्‍तांनी सर्वच तक्रारी ऐकून काही तक्रारी सोडविण्याचे आदेश दिले असून यात ड्रेनेज व अतिक्रमणाच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे आढळून आले. महानपालिका स्वच्छतेकडे लक्ष देत असली तरी नागरिकांनीही स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे असेही आयुक्‍तांनी यावेळी स्पष्ट केले.
   

साडेसहा वाजता या उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी टोकन घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. सुमारे साडेतीन तास सुरु असलेल्या या उपक्रमात अतिक्रमण, ड्रेनेजचे प्रश्न यावर नागरिकांनी समस्या मांडल्या. 

श्री.मुंढे म्हणाले, शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी मनपाची असली तरी त्याची कायमस्वरूपी स्वच्छता राखण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. सिडकोत ड्रेनेज व अतिक्रमण या दोनच समस्या सर्वाधिक असून त्यावर निश्चितच मार्ग काढण्यात येणार आहे.

सिडकोच्या प्लॅननुसार बांधकाम नसल्यास ते अनाधिकृत समजून पाडण्यातच येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महापालिकेच्या ई कनेक्ट ॲपचा जास्तीत जास्त वापर करून त्यावर तक्रारी करा असे आवाहन त्यांनी केले.

आज झालेल्या या कार्यक्रमात अतिक्रमणाच्या तक्रारींबरोबरच विपश्यना केंद्राला जागा द्या, जॉगिग ट्रॅकवर पाणी मारण्याची सुविधा करावी, सफाई कामगार येवू लागले असले तरी ते मास्क लावत नसल्याने त्यांनी मासक लावले पाहिजे अशी सूचना नागरिकांनी केली. दत्तनगर परिसरात एकच जॉगिग ट्रॅक असून त्याठिकाणी अजून एक जॅागीग ट्रॅक करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मटाले नगर उद्यानातील जागा भाडेतत्वावर देण्यात आली आहे, शुभम्‌ पार्क ते माऊली लॉन्स रस्ता पूर्ण करावा, विवेकानंद सभागृहाच्या परिसरात घाण व ड्रेनेजच्या समस्या सर्वाधिक आहेत

गामणे मळा परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून त्याठिकाणी काही विद्युत मोटार लावण्यात येत असल्याची तक्रार अनेकदा केल्यानंतर याठिकाणी कर्मचारी चार ते पाच वेळा आले.पण कारवाई केली नसल्याचे सांगितल्यावर संबंधित कर्मचार्यावर आजच कारवाई करा, असे सांगितले.

सिडकोने प्लॅन बनवून घरांची विक्री केली आहे. कुटूंब वाढले म्‍हणून घरे वाढवून अतिक्रमण केले असे सांगणे चुकीचे असून सिडकोच्या प्लॅननुसारच बांधकाम असेल तर ते ठेवण्यात येणार आहे, अन्यथा उर्वरित बांधकाम पाडण्यातच येणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

जनआंदोलनाने दबाव नको
सिडकोतील अनाधिकृत बांधकामांबाबत काही जण जनआंदोलन करून प्रेशर आणण्याचा प्रयत्न करणार असतील तर तो त्यांनी करू नये. शहराच्या विकासासाठी अनाधिकृत बांधकाम पाडणे आवश्यकच असल्याने ती कारवाई करण्यातचे येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमावेळी नागरी समस्यांचा समावेश होता. गटारी तुंबणे, कचरा फेकणे, घंटागाडी वेळेवर न येणे, कचरा जाळणे, गल्यांबोळात अतिक्रमण करणे, गार्डन मधील अतिक्रमण, भर रस्त्यात भिंत बांधून अतिक्रमण करणे, साफसफाई न होणे, फवारणी न होणे, आदि समस्यांचे गाJहाणे मांडण्यात आले. हा उपक्रम आचारसंहितेचा भंग होउ शकत नाही त्यामुळे हा कार्यक्रम सुरूच राहणार असल्याचे श्री.मुंढे यानी सांगितले.
 

Web Title: marathi news cidco incrochment