जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्कसमधील कलावंतांचा संघर्ष 

आनंद बोरा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

नाशिक ः दिवंगत अभिनेते राज कपूर यांनी "मेरा नाम जोकर' या चित्रपटातून सर्कसमधील कलावंतांची अवस्था समाजापुढे मांडली. पण केवळ तीन तास खेळ बघून, दुःख व्यक्त करून आपण त्यांचे दुःख विसरून गेलो. हा कलावंत एक माणूस आहे. तो आपल्याला आनंद देत असताना त्याचे दुःख मात्र समाजापुढे येतच नाही. हे खरे वास्तव्य आहे. येथील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर सुरू असलेल्या "गोल्डन सर्कस'मधील कलावंतांशी संवाद साधल्यावर आपल्या अनेक व्यथा, अडचणी त्यांनी बोलून दाखवल्या. 

नाशिक ः दिवंगत अभिनेते राज कपूर यांनी "मेरा नाम जोकर' या चित्रपटातून सर्कसमधील कलावंतांची अवस्था समाजापुढे मांडली. पण केवळ तीन तास खेळ बघून, दुःख व्यक्त करून आपण त्यांचे दुःख विसरून गेलो. हा कलावंत एक माणूस आहे. तो आपल्याला आनंद देत असताना त्याचे दुःख मात्र समाजापुढे येतच नाही. हे खरे वास्तव्य आहे. येथील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर सुरू असलेल्या "गोल्डन सर्कस'मधील कलावंतांशी संवाद साधल्यावर आपल्या अनेक व्यथा, अडचणी त्यांनी बोलून दाखवल्या. 

पंजाबमधून आलेला 48 वर्षांचा कीर्तन शर्मा या सर्कसमध्ये जोकराचे काम करतो. उंची साडेतीन फूट... लहानपणी मुले चिडवत असल्याने त्याने शिक्षणाकडे पाठ फिरवली. अठरा वर्षांचा झाल्यानंतर पंजाबमध्ये "पीसीओ'चे छोटे दुकान टाकले आणि त्याला आर्थिक मदत होऊ लागली. पण पुढे मोबाईल क्रांतीमुळे दुकान चालत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. भाऊ, बहीण घरात घेईना... पैशालाच जगात किंमत आहे, असे तो बोलून जातो. मग त्याने पोटाची खळगी भरण्यासाठी सर्कस गाठली... सर्कसमध्ये जोकर होणे पसंद केले. त्याला जोकरचे प्रशिक्षण दिल्यानंतर तो प्रेक्षकांना हसविण्याचे काम करू लागला. आपले सगळे दुःख विसरून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद त्याला बरेच काही देऊन जातो. उंची कमी असल्याने जास्त वेळ उभे राहिले, की पाय दुखतात; पण सर्कसमधील कलावंत त्याच्या मदतीला धावून येतात. आज सर्कस हेच त्याचे घर बनले असून, इतर सहकलावंत त्याचे कुटुंब आहे.. 

...आणि एकमेकांचे सूर जुळले 
या सर्कसमधील नेपाळचा कुमार प्रजा आणि बंगालची सोमा यांचीही प्रेमकहाणी वेगळीच आहे. केरळ येथे राजकमल सर्कसमध्ये दोघांची ओळख झाली. दोघेही कलावंत असल्यामुळे त्यांची मने, सूर जळले आणि सर्कसमध्येच प्रेमकहाणी सुरू झाली... सर्कसमधील त्यांचे स्केटिंग, बांबू आयटम प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. तीन वर्षांनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण सोमाच्या घरातून विरोध झाला. एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या या जोडीने लग्न करण्यासाठी अखेर सर्वांना तयार केले. आज या जोडीला एक वर्षाचा मुलगा आहे. आर्यन त्याचे नाव... या मुलाविषयी त्यांचे मोठे स्वप्न आहे. त्याला सर्कसमध्ये आणणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

भविष्य अंधारमय; कलेला किंमत नाही 
सर्कसमधील कलावंतांचे भविष्य अंधारमय आहे. कलेला किंमत नसल्याचे कुमार प्रजा व सोमा यांचे म्हणणे आहे. मुलाला सरकारीबाबू बनविणार, अशी त्याची आई सांगते. पाच वर्षांनंतर सर्कस सोडून बंगालमध्ये परत जाऊ. मुलाला शिक्षण देणार, मोठे करणार, असं त्याचं स्वप्न आहे. बंगालमध्ये तागाची साडी प्रसिद्ध आहे. हाताने केलेल्या कारागिरीला प्रचंड मागणी आहे. सोमाला ही कला येते. ती सुंदर साड्या बनवू शकते. यामुळे ते कलेचा मार्ग बदलणार असल्याचे सांगतात. जीवनात अनेक अडचणी येतात, त्याला सामोरे जाण्याचे आम्हाला "सर्कस'ने शिकविले आहे. निराश होऊन बसल्यास आयुष्य तेथेच संपते, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. 

Web Title: MARATHI NEWS CIRCUS ARTIST PROBLEM

टॅग्स