दिड हजारांहून अधिक सहकारी संस्थाना अंतिम आदेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

नाशिक : नाशिक महानगरातील 1815 गृहनिर्माण सहकारी संस्थांना अवसायनाचे अंतिम आदेश सहकार खात्याने दिले आहे. त्यांनी या संस्था पुर्नर्जिवित न केल्यास बेशीस्त प्लॅट धारकांवर अंकुश ठेवणे,त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे अशक्‍य होणार आहे. 
 

नाशिक : नाशिक महानगरातील 1815 गृहनिर्माण सहकारी संस्थांना अवसायनाचे अंतिम आदेश सहकार खात्याने दिले आहे. त्यांनी या संस्था पुर्नर्जिवित न केल्यास बेशीस्त प्लॅट धारकांवर अंकुश ठेवणे,त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे अशक्‍य होणार आहे. 
 

नाशिकमध्ये गेल्या चाळीस वर्षापासुन गृहनिर्माण संस्थांची चळवळ चांगली रुजली आहे. त्यातुन अनेकांचे घराचे स्वप्न साकार झाले. सहकार कायद्यान्वये त्यांची सोसायटी स्थापन झाली असली तरी पुर्वी या सोसायंट्यांकडे सहकार खात्यानेही कधी गांभीर्याने पाहीले नाही.त्यामुळे कधी अवसायक नेमण्याची व संस्था अवसायानात काढण्याचीही गरज भासली नव्हती. 
आता मात्र 97 व्या घटना दुरुस्ती नंतर सर्व व्यवहार चोख ठेवणे बंधनकारक झाले आहे.

दरवर्षी वार्षीक सभा घेणे,लेखा परीक्षण सादर करणे, पंचवार्षीक निवडणुक घेणे आवश्‍यक झाले आहे. मात्र 1815 संस्था अद्यापही तालुका उपनिबंधक कार्यालयाच्या नोटीसांना दाद देत नव्हत्या, शेवटी त्यांना अवसायानाच्या अंतीम नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 523संस्थांना अतरीम आदेश पारीत झाले आहे. 
तालुका उपनिबंधक प्रीया दळणार यांच्या कार्यालया समोर ती अवसायानात निघालेल्या संस्थांची यादीही प्रसिध्द झाली आहे. 

पुनर्जीवन करा अन्यथा धोकेच धोके 
या अवसानात निघणाऱ्या संस्थांनी पुनर्जीवनासाठी अर्ज करणे गरजेच आहे. अन्यथा संस्था अवसायानात निघाल्यास मालकी हक्क मिळणार नाही. मिळकत निर्वेध राहणार नाही. संस्थाचे टायटल क्‍लिअर राहणार नाही. ते डिफेक्‍टीव्ह होईल. सभासदांमध्ये एकोप्याची सहकार्याची भावना राहणार नाही. व्यवस्थापन वर्गणी थकवीणाऱ्यांवर कारवाई करणे अश्क्‍य होईल. देखाभाल दुरुस्तीत अडचणी येतील. बेशीस्त फ्लॅट धारकांवर अंकुश राहणार नाही. सहकार खाते कारवाई करु शकणार नाही. तक्रारींचे निराकारण करता येणार नाही. 

अवसायानात संस्था गेल्यानंतर अनेक धोके आहेत. यातुन वाचवीण्यासाठी संस्था पुनर्जीवीत करणे हाच एकमेव मार्ग आहे. संस्था चालकांना काही अडचणी असल्यास गृहनिर्माण संस्थांचा महासंघ मदतीस तयार आहे.गरजुंनी जिल्हा परिषदेजवळील पटेल चेंबर्स येथील हौसींग फेडरेशन कार्यालयात संपर्क साधावा. 
अध्यक्ष- ऍड. वसंतराव तोरवणे 
(गृहनिर्माण सहकारी संस्थांचा महासंघ नाशिक ) 

 

Web Title: marathi news co-operative order