धुळ्यात थंडीचा कडाका; २३ दिवसांनी परतली लाट

सकाळ वृत्तसेवा | Friday, 4 December 2020

धुळे जिल्ह्यात 23 दिवसांनंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणात दिवसभर गारठा राहत आहे. शुक्रवारी 9.5 तापमानाची नोंद झाली आहे.

धुळे : कधी थंडी तर कधी गरमी असा अनुभव गेल्‍या महिनाभरापासून येत आहे. परंतु, धुळे जिल्‍ह्‍यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. गुरूवारी अचानक थंडीची लाट आल्‍याने तापमान दहा अंशाच्या खाली घसरले.

धुळे जिल्ह्यात 23 दिवसांनंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणात दिवसभर गारठा राहत आहे. शुक्रवारी 9.5 तापमानाची नोंद झाली आहे. 23 दिवसांपूर्वी म्हणजेच 12 नोव्हेंबरला धुळ्याचे तापमान 8.6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. थंडीच्या कडाका वाढल्याने याचा जनजीवनावर परिणाम होत आहे. 

गहू लागवडीसाठी फायदा
कडाक्याची पडणारी थंडी गहू लागवडीसाठी लाभदायी असल्याने गहू लागवड करण्याच्या कामाला हरकत नसल्याचं कृषी तज्ञ सांगत आहेत. तर कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण होण्यासाठी नागरिक शेकोटी पेटवत आहेत. ग्रामीण भागात सकाळच्या वेळी दाट धुके राहत असल्याने यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने सकाळच्या प्रहरी व्यायाम करण्यासाठी, फिरण्यासाठी अबाल वृद्धांची गर्दी होत आहे.