आयुक्त मुंढेच्या दिर्घ रजेने चर्चा रंगली बदलीची

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या दिर्घ रजेवर जाणार असले तरी रजे पेक्षा त्यांच्या बदलीचीचं चर्चा पालिका वर्तुळात अधिक आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून आयुक्त मुंढे यांच्या विरोधात रोष आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या दिर्घ रजेवर जाणार असले तरी रजे पेक्षा त्यांच्या बदलीचीचं चर्चा पालिका वर्तुळात अधिक आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून आयुक्त मुंढे यांच्या विरोधात रोष आहे.

सर्वप्रथम पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांचं त्यांच्यावर रोष आहे. करयोग्य मुल्य दरात वाढ करून आयुक्तांनी सर्वसामान्य नागरिकांचा रोष ओढवून घेतला आहे. त्यात पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीवर कर लागु केल्याने शेतकरी वर्ग भडकला आहे. अनाधिकृत लॉन्स, मंगलकार्यालये, पुररेषेतील बांधकामे अनाधिकृत ठरवून तोडण्याची कारवाई सुरु केली आहे. उद्योगांकडील मोकळे भुखंड, पार्किंग आदींवर कर लावल्याने सर्वसामान्यांमध्ये करवाढीची भिती निर्माण झाली आहे. त्यात सिडकोतील अनाधिकृत घरांवर लाल फुल्या मारून तोडण्याचा निर्णय घेतल्याने तेथील नागरिक संतप्त झाले असून सिडको संघर्ष समिती स्थापन करून आयुक्तांविरोधात भुमिका घेण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला आहे.

शहर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करताना चुकीच्या पध्दतीने फेरीवाला धोरण राबविले जात असल्याचा आरोप करतं टपरीधारक, फेरीवाले आयुक्तांविरोधात आक्रमक झाले आहे. भाजप नगरसेवकांकडून देखील थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत मुंढे यांच्या विरोधात तक्रारी पोहोचल्या आहेत. त्यातचं शुक्रवारी ग्रीन फिल्ड लॉन्सवरील कारवाईवरून आयुक्त मुंढे यांना कडक शब्दात फटकारल्याने चोहोबाजूने विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्यापार्श्‍वभूमीवर पंधरा दिवसांची दिर्घ रजा आयुक्तांनी टाकली असली तरी रजे पेक्षा त्यांच्या बदलीचीचं चर्चा अधिक आहे. 
 

Web Title: MARATHI NEWS COMMISIONER ON LEAVE