पीक कर्जासह इंधन दरवाढी विरोधात येवल्यात कॉंग्रेसतर्फे टाळ नाद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

येवला-येवला तालुका कॉंग्रेस पार्टीतर्फे तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने भूल थापा देत सत्ता काबिज केली.मात्र इंधन दरवाढ ,शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप तसेच वाढती महागाई आदीसह अनेक निर्णय धोरणाअभावी निकालात निघाले नाही .भ्रष्टाचारामुळे मालाड,मुंबई,पुणे,तसेच तीवरे धरण फुटुन बळी गेलेल्या दोषींवर कड़क कारवाई करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना अनेक बँका पिक कर्ज नाकारत आहे.

शेती मालाला हमी भाव नाही त्याच प्रमाणे केंद्र सरकारने अर्थ संकल्पात पेट्रोल व् डिझेल वर कर लावण्याची घोषणा करताच झालेली दरवाढ सर्व सामान्य नागरिकांची होणारी आर्थिक ओढातान अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. सरकारने वेळीच दखल घेत शेतकऱ्यांची,नागरिकांची ओढ़ाताण थांबवावी, या सरकारला जागे करण्यासाठी टाळ नाद आंदोलन करण्यात आले. तहसीलदार रोहिदास वारुळे याना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष समीर देशमुख ,जेष्ठ नेते बाळासाहेब मांजरे,सुरेश गोंधळी ,जिल्हा उपाध्यक्षा रश्मीताई पालवे,प्रा अर्जुन कोकाटे,नंदकुमार शिंदे,बळीराम शिंदे,नानासाहेब शिंदे,संदीप मोरे ,राजेंद्र गनोरे,सुकदेव मढ़वाई अमोल फरताले आदि उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news congress andolan